नाशिकरोड|प्रतिनिधी|नवउद्योजकांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या विभागीय संयोजक पल्लवी मोरे यांनी केले.
जिल्हा मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेच्या कार्यकारिणीची सभा गंगापूररोड येथे झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, संस्थेचे जिल्हाध्यक्ष विशाल देसले, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. माधव मुधाळे, सरचिटणीस उल्हास बोरसे, सहसचिव मनोज आमले, कार्याध्यक्ष उमेश शिंदे, खजिनदार सुनील घुले, अमित पवार, कुणाल देसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
विशाल देसले म्हणाले की, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी कोणतीही लाज न बाळगता बूट पॉलिश पासून ते डोक्याच्या तेल मालिशपर्यंत कोणताही व्यवसाय स्वीकारण्यात युवकांनी लाज बाळगू नये या हेतूने मराठा उद्योजक कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षाच्या माध्यमातून नवोद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध केल्या जातात. दीपक भदाणे यांनी सेवा संघाच्या उपक्रमांची माहिती दिली. उद्योजक कक्षाचे जिल्हा सरचिटणीस उल्हास बोरसे म्हणाले की, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नवोद्योजकांसाठी मैलाचा दगड ठरेल.
उद्योग व्यवसाय उभारणीसाठी अडचणी असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. जिल्हा मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्थेचे शहराध्यक्ष अमोल पाटील, इगतपुरी अध्यक्ष अमोल खातळे, चांदवडचे नितीन गांगुर्डे, उद्योजक क्रांती बेडसे, अवधूत सस्कर, संदीप सोमवंशी, अरविंद देशमुख, सुनील कोईनकर, धनंजय शिंदे, सुशांत जाधव, मंगेश टरले, अभिषेक पवार, नितीन पाटील, मनीष अहिरे-पाटील, मयूर मगर, राजीव पगार आदी उपस्थित होते. नवउद्योजकांनी ८००७७७४७२२ या मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन विशाल देसले यांनी केले.
