देशवंडी (सिन्नर)| प्रतिनिधी| सामाजिक तथा आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते प्रवीण कर्डक (देशवंडी) यांनी त्यांच्या मातोश्री कलाकथित विमल रतन कर्डक यांच्या शोक सभेच्या निमित्ताने कुठलही धार्मिक कर्मकांड, अंध श्रद्धा, दुखवटा यास फाटा देत आपण आपला सामाजिक बांधिकली व जबाबदारीचा वसा आणखी कसा पुढे नेऊ शकतो याचा विचार करून परिवर्तनवादी विचारवंत अमरावती येथील प्रसिद्ध व्याख्याते रवी मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करून खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन या विषयी मार्गदर्शन केले. द्वेष उच्च नीच, हेवे दावे याला मूठमाती देऊन सुशिक्षित सुज्ञ जबाबदार, कर्तव्यदक्ष समाज कसा निर्माण करता येईल यासाठी काय केले पाहिजे या विषयी रवी मानव यांनी संत गाडगेबाबा छ. शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज डॉ आंबेडकर यांचे दाखले देत प्रकाश टाकला. शिक्षणच्या अभावामुळे व अज्ञानामुळे लोकांच कसे शोषण केलं जातं ते अंधश्रद्धेला बळी पडतात, कर्मकांडाच्या भूत प्रेताच्या मागे लागून आणखीन भरकटतात. त्यासाठी आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे म्हणून सर्वांनी सुशिक्षित होऊन कर...