Skip to main content

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जाती अंताची चळवळ बळकट करण्यासाठी सामुदायिक प्रयत्नांची गरज : रवी मानव

देशवंडी (सिन्नर)| प्रतिनिधी| सामाजिक तथा आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते प्रवीण कर्डक (देशवंडी) यांनी त्यांच्या मातोश्री कलाकथित विमल रतन कर्डक यांच्या शोक सभेच्या निमित्ताने कुठलही धार्मिक कर्मकांड, अंध श्रद्धा, दुखवटा यास फाटा देत आपण आपला सामाजिक बांधिकली व जबाबदारीचा वसा आणखी कसा पुढे नेऊ शकतो याचा विचार करून परिवर्तनवादी विचारवंत अमरावती येथील प्रसिद्ध व्याख्याते रवी मानव यांच्या व्याख्यानाचे आयोजन करून खऱ्या अर्थाने समाज प्रबोधन अंधश्रद्धा निर्मूलन, जातीभेद निर्मूलन  या विषयी मार्गदर्शन केले.
Community-efforts-needed-to-strengthen-Dr-Babasaheb-Ambedkars-caste-end-movement-Ravi-Manav
द्वेष उच्च नीच, हेवे दावे याला मूठमाती देऊन सुशिक्षित सुज्ञ जबाबदार, कर्तव्यदक्ष समाज कसा निर्माण करता येईल यासाठी काय केले पाहिजे या विषयी रवी मानव यांनी संत गाडगेबाबा छ. शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, शाहू महाराज डॉ आंबेडकर यांचे दाखले देत प्रकाश टाकला. शिक्षणच्या अभावामुळे व अज्ञानामुळे लोकांच कसे शोषण केलं जातं ते अंधश्रद्धेला बळी पडतात, कर्मकांडाच्या भूत प्रेताच्या मागे लागून आणखीन भरकटतात. त्यासाठी आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे म्हणून सर्वांनी सुशिक्षित होऊन कर्मकांड अंधश्रद्धा याला कुठलाही थारा न देता आपला स्वतःचा आपल्या गावाचा आपल्या समाजाचा व आपल्या संपूर्ण देशाचा कसा विकास होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. असा संदेश देत समाज प्रबोधन केले. व त्याबरोबर शिक्षण व्यवस्थेतील, राजकीय व्यवस्थेततील गैरप्रकारांवर प्रकाश टाकला.
 
जागतिकिकरणाचे जीवघेणे कायदे व व्यक्ती, समाज व राष्ट्रवरील विपरीत परिणाम, खाजगीकरणात आरक्षणाची नसलेली तरतूद नव्या पिढीला नीट समजून न सांगता जाती-जातीमध्ये राजकिय षडयंत्र करून त्यांची माथी भडकवली जात आहेत. माती व मतीची मशागत केल्या शिवाय बुद्ध-कबीर, तुकोबा, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सांगता येणार नाही असे मत यावेळी बोलतांना लोककवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानचे संस्थापक, कार्याध्यक्ष प्रा. शरद शेजवळ यांनी व्यक्त केले.

शोकसभा (उद्बोधन) च्या अध्यक्षस्थानी जेष्ट आंबेडकरी कार्यकर्ते पोपटराव जाधव हे होते. धम्म संस्कार विधी बाळासाहेब आव्हाड यांनी केला. नाशिक महानगर पालिकेच्या माजी नगरसेविका प्रा.कविताताई  कर्डक, उदयभाऊ सांगळे, अमर ताविडे, महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे डॉ.वाळके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शरद शेजवळ यांनी केले, सूत्रसंचालन किशोर सोनवणे यांनी केले. आभार प्रवीण कर्डक यांनी मानले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...