Skip to main content

विकसित भारतासाठी शिक्षण आणि आरोग्य महत्वपूर्ण: कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस

नाशिक|प्रतिनिधी| विकसित भारतासाठी शिक्षण आणि आरोग्य महत्वपूर्ण असल्याचे  प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी आरोग्य विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाप्रसंगी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा तेविसावा दीक्षांत समांरभात विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस अध्यक्षस्थानी ऑनलाईन उपस्थित होते. 
The-23rd-convocation-ceremony-of-the-University-of-Health-Sciences-concluded-with-enthusiasm

या समारंभास व्यासपीठावर विद्यापीठाचे मा. प्र-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा.नामदार श्री. हसन मुश्रीफ प्रमुख अतिथी म्हणून व सन्माननीय अतिथी म्हणून बेळगांवचे के.एल.ई. अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे मा. कुलगुरु डॉ. नितीन गंगने, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे, मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., डॉ. ख्रिस्तोफर डिसूजा, मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परिक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, वित्त व लेखाधिकारी श्री. एन.व्ही. कळसकर, विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विठ्ठल धडके, डॉ. विभा हेगडे, डॉ. मिलिंद आवारे, डॉ. राजकुमार पाटील, डॉ. वाय. प्रविणकुमार, डॉ. मनिष इनामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
      दीक्षांत समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. रमेश बैस यांनी सांगितले की, राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यापीठाचे कार्य महत्वपूर्ण आहे. आरोग्य क्षेत्रात काम करणारे सर्वांनी कोविडच्या काळात उल्लेखनीय काम केले आहे. पदवी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आरोग्य क्षेत्रात सामाजिक भान जागृत ठेऊन मनोभावे रुग्णसेवा करावी. विकसित व आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीत आपली सर्वांचे कार्य महत्वपूर्ण आहे. 
       ते पुढे म्हणाले की, देशाची प्रगतीचा स्तर हा पायाभूत सुविधा व शैक्षणिक गुणवत्तेवर आधारित असतो. शैक्षणिक बाबीचा महत्वपूर्ण स्तंभाचा आपण भाग असून प्रत्येकाची भूमिका महत्वपूर्ण आहे. विद्यार्थ्यांनी अद्ययावत ज्ञान संपादन करुन जागतिक स्तरावर होणारे संशोधनात नावलौकिक मिळवावा. संशोधनाला चालना मिळावी या हेतूने आरोग्य विद्यापीठाने विविध उपक्रम सुरु केले आहेत. त्याचा सकारात्मक उपयोग विद्यार्थ्यांनी करावा. आरोग्य क्षेत्रात तंत्रज्ञानाबरोबर नवीन क्रांती घडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. नवीन विचार आणि विज्ञानाची साथ असल्यास अत्यंत कमी कालावधीत यशस्वी होऊ अशी आशा बाळगतो असे त्यांनी सांगितले.
       विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार श्री. हसन मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, विद्यापीठामार्फत संशोधन, शिक्षण आणि प्रशिक्षण यांवर मोठया प्रमाणात करणे आवश्यक आहे. यासाठी विद्यार्थी व शिक्षकांकरीता कौशल्य आधारित नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. जागतिक स्पर्धेत अध्यापन, संशोधन आणि विद्यार्थ्यांचे संगोपन यात क्रांती होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आयुष्यभर शिकण्याच्या प्रक्रियेत आणि रुग्णसेवेमध्ये व्यग्र रहावे आणि काळानुरफप आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. 
   ते पुढे म्हणाले की, राज्यातील प्रत्येक जिल्हयात एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, नर्सिंग व आयुष अंतर्गत सर्वच विद्याशाखांचे महाविद्यालयांना मान्यता व त्याकरीता आवश्यक मनुष्यबळ यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनाला मान्यता मिळेल असे गुणवत्तापूर्ण संशोधन प्रकल्पांना चालना देणे गरजेचे आहे. आरोग्य क्षेत्रातील सर्व पदवीधारकांनी रोगनिवारणाबरोबर रोगप्रतिबंधासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले
        विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी प्रास्ताविकात सांगितले की, तंत्रज्ञानाचा वापर विद्यापीठात मोठया प्रमाणात वाढला असून नॅशनल अकादमी डिपॉझिटरी अंतर्गत डिजिलॉकरवर विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सी.बी.एम.ई. एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या ब्लू प्रिंटचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच दंत अभ्यासक्रमाची ब्लू प्रिंट तयार केली असून फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची ब्लू प्रिंट अंतिम प्रक्रियेत आहे.
ऽ   इनोव्हेशन आणि आयडिया इनक्युबेशन उपक्रम नजीकच्या भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील संस्थांच्या मदतीने आणि सहकार्याने बळकट केले जाणार आहेत.  ज्ञान आणि कौशल्ये जाणून विद्यार्थी-केंद्रित धोरणे आणि गुणवत्ता वाढीवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. सामाजिक बांधिलकी, उच्च दर्जाचे आरोग्य व्यावसायिक तयार करण्यासाठी संशोधन आणि शिक्षणात उत्कृष्टता प्राप्त करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सागितले.
        के.एल.ई. अॅकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अॅण्ड रिसर्चचे मा. कुलगुरु        डॉ. नितीन गंगने यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, आरोग्य शिक्षणाचा उपयोग विद्यार्थ्यांनी समाजातील लोकांची आरोग्य सेवा करण्यात द्यावा. शिक्षण आणि आरोग्य विकासातील महत्वपूर्ण बाबी आहेत. शिक्षणाबरोबर संशोधनाची जोड असणे गरजेचे आहे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे. शिक्षण ही निरंतर घडणारी गोष्ट आहे त्यासाठी शिस्त व परिश्रम महत्वाचे आहेत. आरोग्य क्षेत्रात संशोधनासाठी मोठया प्रमाणात संधी उपलब्ध आहेत यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेऊन नवनवीन कल्पनांना मूर्त रुप देऊ शकता असे त्यांनी सांगितले.
     डॉ. ख्रिस्तोफर डिसूजा यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, विद्यापीठाने केलेला सन्मान माझ्यासाठी उल्लेखनीय आहे. आरोग्य क्षेत्रात केलेल्या कामाचा विद्यापीठाकडून झालेला सन्मानाबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. आजवरच्या वाटचालीत मला कुटुंब, मित्र आणि विद्यापीठाकडून मिळालेले सहकार्यामुळे हा सन्मान शक्य झाला आहे. आरोग्य व रुग्ण सेवेच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा आदर्श घ्यावा असे काम सर्वांनी करावे असे त्यांनी सांगितले. 
        या दीक्षांत समारंभात विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 12486 स्नतकांना पदवी प्रदान करण्यात आली. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 111 विद्यार्थ्यांना 139 सुवर्णपदक, एक विद्यार्थ्यास रोखरक्कम पारितोषिक व संशोधन पूर्ण केलेल्या 26 विद्यार्थ्यांना पीएच.डी. (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
        विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 551, दंत विद्याशाखा पदवीचे 2195, आयुर्वेद विद्याशाखेचे 871, युनानी विद्याशाखेचे 99, होमिओपॅथी विद्याशाखेचे 1217, बेसिक बी.एस्सी. नर्सिंग 2464, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे 366, बी.पी.टी.एच.विद्याशाखेचे 254,, पॅरामेडिकल विद्याशाखेचे 637, पदवी ऑप्टोमेट्री 52, ऑक्युपेशनल थेरपी पदवी अभ्यासक्रमाचे 17, बी.पी.ओ.विद्याशाखेचे 04 तसेच पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये पी.जी. मेडिकल 2864, पी. जी. दंत 497, पी.जी. आयुर्वेद 63, पी.जी. होमिओपॅथी 18, पी.जी. एम.ए.एस.एल.पी. 02, डिप्लोमा मेडिकल विद्याशाखेचे 02 , पी.जी. एम.पी.ओ. 02, पी.जी नर्सिंग 92, पी.जी. ऑक्युपेशनल थेरपीचे 29, पी.जी. फिजिओथेरपी 15, पी.जी. डि.एम.एल.टी. 87, डिप्लोमा पॅरामेडिकल विद्याशाखेचे 88 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली आहे. 
          आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. ख्रिस्टोफर डिसूजा यांना डी.लिट् ही विद्यापीठाची विशेष संमान्य पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमचे ’ई-प्रबोधिनी’ व बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी पुस्तिकेची ब्ल्यु प्रिंट यांचे प्रकाशन करण्यात आले.
      कार्यक्रमाच्या प्रारंभी विव्दजन मिरवणूकीने समारंभास्थळी आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. परीक्षा नियंत्रक डॉ. यांनी मान्यवरांचे आभार मानले. मा. राज्यपालांना कुलसचिव       डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी पदवी प्रदानाबद्दल विनंती केली.या दीक्षांत समारंभाचे यु-टयुब चॅनेवर थेट प्रक्षेपण करण्यात आले. विद्यापीठाचे प्राधिकरण सदस्य, संलग्नित महाविद्यालाचे शिक्षक, विद्यार्थी, पालक व अभ्यागतांनी मोठया संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...