Skip to main content

गादी बनविण्यासाठी बिबट्यालाच मारले ठार; पाच जण ताब्यात

इगतपुरी|प्रतिनिधी| गादी बनविण्यासाठी बिबट्याची कातडी विक्रीसाठी आलेल्या पाच संशयितांना इगतपुरी पोलिसांनी सापळा रचून रंगे हाथ ताब्यात घेतले. कथित बाबाच्या सांगण्यावरून संशयितांनी बिबट्याला ठार केल्याचा प्रकार समोर आला आहे. 
A-leopard-is-killed-to-make-a-mattress-Five-people-in-custody
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार घोटी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव मोर शिवारातील मोराच्या डोंगराच्या पायथ्याची काही संशयित इसम वन्यप्राणी बिबट्याची कातडी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बुधवारी सापळा रचून संशयित नामदेव दामु पिंगळे, वय ३०, रा. पिंपळगाव मोर, ता. इगतपुरी, संतोष सोमा जाखेरे, वय ४०, रा. मोगरे, ता. इगतपुरी, रविंद्र मंगळु आघाण, वय २७, रा. खैरगाव, ता. इगतपुरी, बहिरू उर्फ भाऊसाहेब चिमा बेंडकोळी, वय ५०, रा. पिंपळगाव मोर, वाघ्याची वाडी, ता. इगतपुरी,  बाळु भगवान धोंडगे, वय ३०, रा. धोंडगेवाडी, ता. इगतपुरी यांना ताब्यात घेवुन त्यांच्या कब्जातील गोणपाटातून बिबट्याची कातडी व एक लोखंडी कोयता जप्त केला आहे. 

सदरची कातडी ही परिक्षणासाठी जिल्हा पशुवैद्यकिय सर्व चिकित्सालय, नाशिक येथे पाठविली असता ती वन्यप्राणी बिबट्याची असल्याचा अभिप्राय प्राप्त झाला आहे. या प्रकरणी पुढील तपास इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांचे पथक करीत आहे. ह्याबाबत सखोल तपास केला असता यातील आरोपी संतोष जाखेरे याचा साथीदार नामे संन्यासी दिलीप बाबा यास बाबागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी बनविण्यासाठी वाघाची कातडी पाहिजे होती असे सांगितले. त्यासाठी यातील आरोपी नामदेव दामु पिंगळे हा गुरे चारण्यासाठी मोराचे डोंगरावर जात असे. या ठिकाणी वन्यप्राण्यांचे पाणी पिण्याचे डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटरसायकलच्या क्लजवायरचा गळफास तयार करून पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याला पकडून ठार मारले. यानंतर यातील सर्व आरोपींनी मिळून बिबट्याची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुकवत ठेवून सदरची कातडी ही संन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याचे तपासात समोर आले आहे. 

या प्रकरणातील संशयीत आरोपी संन्यासी दिलीप बाबा याचा पोलीस पथक शोध घेत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा संदिप नागपुरे, चेतन संवस्तरकर, मेघराज जाधव, हेमंत गरूड, पोना विनोद टिळे, प्रदिप बहिरम, हेमंत गिलबिले, मनोज सानप यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...