Skip to main content

मराठा साम्राज्याचे चलन: एक दिवसीय परिसंवाद

नाशिक|छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतल्यावर अंगात संचारणारी ऊर्जा वेगळीच असते. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन ३५० वर्षांपूर्वी घडविलेला इतिहास आजही प्रेरणादायी आहे. स्वराज्य निर्माण होत असताना, आणखी एक गोष्ट रूप घेऊ लागली होती आणि ती म्हणजे स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन. महाराजांनी स्वराज्याचे प्रतिनिधित्व करणारे चलन सुरू करणे ही काही साधारण घटना नव्हती. या घटनेचा आणि छत्रपतींच्या शिवराईसह मराठा साम्राज्यातील चलनांवर छत्रपती शिवाजी महाजरांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक विभागाच्या दर्शनिका विभाग आणि के. टी. एच. एम. महाविद्यालया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठा साम्राज्याचे चलन’ या विषयावर राज्यस्तरीय एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे.
Currency-of-the-Maratha-Empire-A-One-Day-Seminar


ही कार्यशाळा रविवारी, १७ मार्च रोजी गंगापूररोडवरीलके. टी. एच. एम. महाविद्यालयाच्या व्हीएलसी सभागृहात होत आहे. ही कार्यशाळा सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. या कार्यशाळेत चार वक्ते मराठा साम्राज्यातील चलन या विषयावर व्याख्यान देणार आहेत. १)श्री प्रशांत ठोसर, २) श्री पुरुषोत्तम भार्गवे, ३) श्री आशुतोष पाटील, ४)श्री रमेश पडवळ

‘मराठा साम्राज्याचे चलन’ या विषयावर राज्यस्तरीय एक दिवसीय परिसंवादाचे उद्‌घाटन श्री नितिन मुंडावरे  सर उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार असून, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दर्शनीका विभागाचे सचिव डॉ दिलीप बलसेकर व KTHM कॉलेजचे प्राचार्य आर. डी . दरेकर  उपस्थित राहणार आहेत. राज्य परिसंवाद मध्ये सहभागी होण्यासाठी नावनोंदणी ९८५०१११५०३ (चेतन राजापूरकर ) या नंबरवर करायची आहे 


इतिहास अभ्यासकांसाठी महत्वपूर्ण

छत्रपति शिवाजी महाराजांच्या  शिवराज्याभिषेकला ३५० पूर्ण झाले या निमित्ताने मराठा साम्राज्याचे चलन याविषयी परिसंवाद महाराष्ट्र शासन व KTHM महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. हा कार्यक्रम इतिहास अभ्यासकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे सर्व   अभ्यासकांनी जरूर सहभागी व्हावे

चेतन राजापूरकर 
प्राचीन नाणे संग्राहक व अभ्यासक

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...