Skip to main content

भाषा हेच संवादाचे आणि शिक्षणाचे माध्यम: कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर

नाशिक|प्रतिनिधी|भाषा हे खरं तर संवादाचे आणि शिक्षणाचे माध्यम आहे त्याचा उपयोग बौद्धिक, मानसिक, वाचिक क्षमता वाढविण्यासाठी करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलगुरु निवृत्त लेफ्टनन्ट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात ’कुसुमाग्रज स्मरण यात्रा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कानिटकर बोलत होत्या. यावेळी त्यांच्या समवेत मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू आदी मान्यवर उपस्थित होते.
Language-is-the-medium-of-communication-and-education-Vice-Chancellor-Madhuri-Kanitkar
याप्रसंगी मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काम करण्याची माझी मोठी इच्छा आहे आणि सुदैवाने मी कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत राहत आहे याचा मला अभिमान वाटतो. आपण मराठी साहित्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. विज्ञान कितीही पुढे गेले तरी समाजाला एकत्र ठेवणारी संस्कृतीच असते असे त्यांनी सांगितले.

विद्यापीठाचे मा. प्रति-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ यांनी सांगितले की, प्रत्येक प्रांतानुसार मराठी भाषेचा लय बदलतो मात्र भाषेचा गोडवा कायम राहतो. मराठी ही सर्व भाषा सर्व बाजूंनी समृध्द आहे तिचा वापर मोठया प्रमाणात होणे गरजेचे आहे. संगणक आणि मोबाईलचा अतिवापरामुळे भाषेवर परिणाम होत आहे यासाठी वाचन संस्कृती जोपासणे गरजेचे आहे. यासाठी भाषेचे संवर्धन करूया. भाषेची अस्मिता जागृत ठेवण्यासाठी स्पर्धा व कार्यक्रमाच्या माध्यमातुन जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
         
विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ यांनी सांगितले की, मराठी भाषेला आपण प्राधान्य दिले पाहिजे. मराठी भाषेचा प्रसशासकीय कामात वापर वाढणे आवश्यक आहे. भाषेची समृध्दता जपण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी सांगितले की, मानवी संवेदना काव्यातून, ग्रंथांतून, आणि भाषणातून व्यक्त करण्यासाठी भाषा हे महत्वाचे माध्यम आहे. बालवयात मुलांना भाषेची जाण करुन देणे गरजेचे आहे. यासाठी मराठी पुस्तकांचे वाचन करावे. पुस्तक वाचनातून साहित्याची आवड निर्माण होते. भाषा समृध्द होण्यासाठी त्यास बळकटी मिळते असे त्यांनी सांगितले.

या अनुषंगाने विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सहभागातून कुसुमाग्रज स्मरण यात्रा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे समन्वयन व सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. या कार्यक्रमात श्री. उल्हास कुलकर्णी, श्रीमती सविता पाटील, श्री. अजित डेरे यंानी कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्यातील काव्यांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...