Skip to main content

सोने @७९ हजारी, सोन्याची चमक आणखी वाढणार!

नाशिक| सणासुदीचा काळ असल्याने सोन्याची चमक आणखी वाढली असून सोने दर २६९४ ते २७२७ डॉलर इतका होता, म्हणजेच जीएसटीसह सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅमला ७९००० रुपयांवर जाऊन पोहचले. बुधवारी सोने जीएसटीसह ७८९०० रु. होते, म्हणजे ८००  रुपयांची वाढ झाली होतीे, तर चांदीच्या भावात किलोला बाराशे रु. वाढ झाली. येणाऱ्या काळात सोने ८५ हजाराचा टप्पा पार करेल, असे मत सराफा व्यावसायिकांतर्फे  व्यक्त करण्यात आले आहे.

मुख्य म्हणजे अमेरिकेतील संभाव्य व्याजदर कपातीची शक्यता आणि मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे व क्रूड ऑईलच्या कमी झालेल्या किंमती यामुळे सोन्याला मागणी वाढत आहे. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ग्राहकांकडून पसंती दिली जातं आहे. यापूर्वी सोने दरातील चढ-उतार ही अल्प काळ होती. आता पुन्हा सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे बघितले जात आहे. यापूर्वी सोन्याचे दर कमी होऊन ७५,५०० रुपये प्रती १० ग्रॅम झाले होते. आता सोने दराने पुन्हा उसळी घेत ७९,००० रुपयांपर्यंत मजल गाठली आहे.  त्यामुळे गुरूपुष्यमृत मुहूर्त आणि दिवाळी अशा एकापाठोपाठ येणाऱ्या सणामुळे सोने दरात तेजी बघायला मिळत आहे. आगामी काळात सोन्याची आणखी भाववाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आली आहे.
----------------------------------------------

दर आणखी वाढतील 

सणासुदीच्या काळ असल्याने भविष्यात सोन्याचे बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता असून सोने ८५००० रुपयांपर्यंत पोहचेल अशी सध्याची परिस्थिती आहे. सोन्याची चढउतार अल्प काळ होती. आता यापुढे दर वाढत राहतील.

चेतन राजापूरकर,

संचालक, राजापुरकर सराफ,
माजी अध्यक्ष सराफ असो. नाशिक
----------------------------------------------

सोने दरात विक्रमी वाढ

सोन्याने ७७००० रुपये प्रति ग्रॅम असे दराचे नवीन शिखर गाठले असून मुख्यत्वे अमेरिकेतील संभाव्य आक्रमक व्याजदर कपातीची अपेक्षा आणि मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या गुंतवणुकीकडे ग्राहकांचा कल दिसून येत आहे.

मेहुल थोरात

संचालक, में. विश्वनाथ थोरात सराफ, नाशिक. उपाध्यक्ष, नाशिक सराफ असोसिएशन.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...