Skip to main content

महाविकास आघाडीचे घोषणापत्र म्हणजे घोटाळापत्र: नरेंद्र मोदी

नाशिक|दिअँकर वृत्तसेवा| एकीकडे महायुतीचे घोषणापत्र तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे घोटाळापत्र आहे. हे पक्के आहे की जेथे काँग्रेस व त्यांचे सहकारी पक्ष आहे तेथे घोटाळा होणारच असे सांगून ते अशा योजनांची घोषणा करतात की ज्यामध्ये जास्तीत जास्त घोटाळा होईल, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केली.


नाशिक येथील तपोवन मैदानात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी काँगेस आणि सहकारी पक्षांच्या महविकास आघाडीवर सडकून टीका केली त्याप्रसंगी ते बोलत होते. मोदी म्हणाले की, महाराष्ट्र विकसित झाला तर भारत विकसित होईल त्यासाठी आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे. महाराष्ट्रातील लोकांनी लक्षात घेतले पाहिजे की महाराष्ट्रात भाजप महायुती आहे म्हणून गती आणि प्रगती आहे देश विकास करत असून विकासाचे नवे रेकॉर्ड बनत आहे. देशात गरिबांची चिंता करणारे सरकार असून गरीब पुढे गेला तर देश पुढे जाईल, मात्र काँग्रसने गरिबी हटावचा नारा दिला तरी गरीब रोटी, कपडा आणि मकानपासून काँगेसच्या काळात वंचित राहिला. केंद्रातील भाजपा सरकारच्या १० वर्षाच्या कार्यकाळात २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले. हे कसे झाले कारण की मोदीची नियत चांगली होती, मी सगळ्यांचा आणि तुमचा सेवक म्हणून काम केले, गरिबी विरोधात सर्वांसोबत लढाई लढली त्यामुळे हे शक्य झाले.


मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

• ५० लाख महिलांना उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला

• जलजीवन मिशन योजनेच्या मध्यामातून सव्वा करोड लोकांना नल से जल सुविधा दिली.

• महाराष्ट्रातील ७ कोटी लोकांना मोफत राशनचा लाभ उपलब्ध करून दिला.

• पीएम आवास योजनेतून २६ लाख लोकांना पक्की घरे दिली. यासाठी सातत्याने महायुतीचेे काम सुरू आहे.

• शेतकऱ्यांसाठी पीएम सन्मान निधी व महायुती सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेतून प्रत्येकी ६ हजार प्रमाणे असे १२ हजार रुपये दिले. महायुती सरकार पुन्हा आल्यास हा निधी १५ हजार करण्यात येईल असे आश्वासन दिले.

• पेट्रोल मध्ये इथेनॉलचा वापर करुन त्यास प्रोत्साहन दिले, त्यातून ८० कोटी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झाला.

• पेट्रोल खरेदीमुळे विदेशात जाणारे चलन शेतकरयांना मिळाले.

• नाशिकच्या कांदा उत्पादकांच्या भावना मला माहिती आहे. म्हणून कांदा निर्यातीबाबतचे धोरण बदलून शेतकरयांना दिलासा दिला. महाराष्ट्र पुढे गेला तरच देश देश पुढे जाईल.

•देशात आधुनिक पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र खूप पुढे आहे. आधुनिक टेकनोलॉजीत गुंतवणूक वाढत आहे.

• एखाद्या सरकारने काम थांबवले तर महाराष्ट्र कसा पुढे जाईल? रोजगार कसा मिळेल?  असा सवाल करुन अशा प्रकारे विकासाची कामे थांबली तर महाराष्ट्राची पिछेहाट होईल.

• महाआघाडीने अटल सेतूला विरोध केला, वाढवण बंदराला विरोध करुन मेट्रो योजनेला अडथळे आणले. समृद्धी महामार्गाचे काम ठप्प केले. महायुतीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात अडथळे आणून महाराष्ट्राला विकासापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.


*काँग्रेस व त्यांचा सहकारी पक्ष कोर्ट आणि देशातील जनतेची भावना समजू शकले नाही. खिशात कोऱ्या पानांचे पुस्तक घेऊन फिरत आहे. ते लोकांची दिशाभूल करत आहे. महाआघाडी संविधानाची रक्षा आणि सन्मानाची गोष्टी करून त्याविरुद्ध काम करत आहे, असा आरोप त्यांनी केला. ७५ वर्षापासून काश्मीरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान लागू होऊ दिले नाही, देशात दोन संविधान लागू होते. भाजप सरकारने काश्मीर मधील ३७० कलम हटवून एक देश एक संविधान लागू करुन डॉ. आंबेडकरांना श्रद्धांजली दिली.

• काश्मीरमध्ये  ३७० कलम हटविले  तुम्ही आनंदित आहात का असा सवाल नाशिकरांना केला असता तेव्हा उपस्थितांनी होकार दिला. तुम्हाला आनंद झाला पण काँग्रेसच्या पोटात दुखले. तुम्ही टिव्हीवर बघितले असेल जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलम लागू करण्यासाठी काँग्रेस आणि सहकारी पक्षांनी गोंधळ घातला. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हटवून दलित, मागासवर्गीय समाजाला आरक्षणापासून वंचित ठेऊन दलित, मागास लोकांना मागे ठेवण्याचे षडयंत्र आहे. 

• भाजपाचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेसकडे एकच पर्याय आहे, तो म्हणजे खोटे बोलण्याचा, त्यांचे हे दुकान तेलंगणा व हरियाणामध्ये चालले नाही तेथे खोट्या दुकानाचे शटर खाली करावे लागले.

• काँग्रेसकडे ज्या राज्यात सत्ता आहे, तेथे कर्मचाऱ्यांचा पगार करण्यासाठी पैसे नसून त्यासाठी जनतेवर कर लादले जाऊन वसुली सुरू असल्याचे टीका केली.

• काँग्रेसला आपल्या करतूतीमुळे लोकांनी नाकारले असून आता ऑल इंडिया काँग्रेस राहिली नसून ती परजीवी काँग्रेस बनली आहे. त्यांना सहकारी पक्षाच्या कुबड्या घेऊन उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. काँग्रेस पुन्हा आपल्या पायावर उभे राहू शकत नाही.

*काँग्रेस ने राजकारणात टिकून राहण्यासाठी एस/एसटी व ओबिसीमध्ये फूट पाडून राज्य केले. काँगेस काळात ओबीसी कधीच एवढा एकजूट नव्हता. ९० च्या दशकात ओबीसी एकजूट बनला, ताकद दाखवली अन् हक्कासाठी जागृत झाला. त्यामुळे काँग्रेस सरकार पडले. त्यामुळे काँग्रेस ओबीसीला कमजोर करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू पासून आताच्या चौथ्या पिढीने ही तोच मार्ग अवलंबला आहे. 

*महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेची देशाच्या कानाकोपऱ्यात चर्चा आहे. महिला भगिनींना या योजनेचा लाभ होत आहे. काँग्रेसला मात्र या योजनेचा त्रास होत आहे, ही योजना बंद करण्याचा घाट घालत असून त्यासाठी कोर्टात ही गेले. असे असले तरी भाजपा महायुती महिला सन्मान आणि प्रगतीसाठी महिलांच्या सशक्तीकरणासाठी समर्पित आहे.

*३ कोटी बहिणींना लखपती दीदी योजनेचा फायदा मिळाला

*केंद्राच्या १०० दिवसाच्या कार्यकाळात गरिबांना पंतप्रधान आवास योजनेचा फायदा मिळून देत जे घर महिलांच्या नावावर आहे अशा ३ कोटी घरांना मंजुरी दिली.

*मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. ओळख दिली, महान भाषेला सन्मान प्राप्त करुन दिला. 

*काँग्रेसने आमचे प्रेरणास्थान वीर सावरकर यांचा अपमान केला. आघाडीतील एक पक्ष सावरकरांवर बोलत असतो. पण मी सर्व महाविकास आघाडीला आव्हान देतो की त्यांच्यात हिम्मत असेल तर १५ मिनिट सावरकरांची प्रशंसा करुन दाखवावी.

नाशिकबाबत महत्वाचे मुद्दे

• आधुनिक पायाभूत सुविधांमुळे नाशिकचा चेहरा मोहरा बदलला. २०२६ च्या कुंभमेळ्यासाठी त्याचा फायदा होईल.
• आय टी पार्कमुळे युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
• नाशिक डिफेन्स क्षेत्रात आत्मनिर्भर होऊन मुख्य केंद्र बनले.
• लढाऊ विमान व सुरक्षा उपकरणे बनत आहेत.
• नाशिकरांना गर्व असेल की हे शहर सशक्त भारतासाठी महत्वाची भूमिका निभावत आहे. दुसरीकडे  काँगेस आघाडी भारताला कमजोर करण्याचा प्रयत्न करत आहे. 

*एचएएल बाबत खोट्या अफवा पसरवल्या, फॅक्टरी बाहेर निदर्शने केली. कर्मचाऱ्यांना भडकवले आता एचएएल नफा कमवत आहे. डिफेन्समध्ये भारत आत्मनिर्भर बनला आहे.




Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...