Skip to main content

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन

मुंबई |भाजपाचे संकल्पपत्र हे महाराष्ट्राला देशात अव्वल स्थानी राखणारे ठरेल, तसेच या संकल्पपत्राच्या आधारे  महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर्सचे  उद्दीष्ट पार करेल असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री श्री अमिअत शाहा यांनी केले. आगामी निवडणुकांसाठीच्या  महाराष्ट्र भाजपाच्या संकल्पपत्राचे प्रकाशन काल मुंबईत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते श्री अमित शाहा यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते पत्रकारांना संबोधित करीत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हे संकल्पपत्र जनतेचे संकल्प साकार करणारे ठरेल. तर यावेळी बोलतांना भाजपाच्या जाहिरनामा समितीचे प्रमुख मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की जनतेच्या सहभागातून तयार करण्यात आलेले हे संकल्पपत्र राज्याच्या विकासाचे दृष्टीपत्र ठरणार आहे. 


रविवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत महाराष्ट्र भाजपाच्या विधानसभा निवडणुकांसाठीच्या संकल्पपत्राचे प्रकाशन केंद्रीय गृहमंत्री श्री. अमित शाहा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय महासचिव श्री. विनोद तावडे, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष श्री. सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल, निवडणुक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. रावसाहेब दानवे, जाहिरनामा समितीचे संयोजक डॉ.श्री. विनय सहस्रबुद्धे, मुंबई भाजपा अध्यक्ष श्री. आशिष शेलार हे मान्यवर उपस्थित होते.


यावेळी श्री. अमित शाहा पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीने आजवर दिलेली आश्वासने नेहमीच पूर्ण केली आहेत. जम्मू - काश्मीर चे 370 वे कलम रद्द करणे, तिहेरी तलाक रद्द करणे, नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती (सीएए), राम मंदिर उभारणी अशी भाजपाने पूर्ण केलेल्या अनेक आश्वासनांची उदाहरणे श्री. अमित शाहा यांनी यावेळी दिली. 2014 मध्ये महाराष्ट्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपा महायुती सरकारने महाराष्ट्राच्या विकासाला गती देणारे अनेक निर्णय घेतले, असेही ते म्हणले. भारतीय जनता पार्टीने समाजाच्या सर्व घटकांचा विचार करून तयार केलेले हे संकल्प पत्र हे राज्याच्या जनतेचे आकांक्षा पत्र आहे, असेही श्री. शाह यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री. शाह यांनी महायुती सरकारच्या काळात पूर्ण झालेल्या निळवंडे, गोसीखुर्द, टेंभू या सिंचन योजना, कोस्टल रोड, अटल सेतू सारखे रस्ते, पूल, नार पार सारखे नदीजोड प्रकल्प अशा अनेक योजनांचा उल्लेख केला. आजवर राज्यातील कॉंग्रेस आणि शरद पवार यांच्या राजकारणाने शेतकऱ्यांचा आणि गरीबांचा नेहमी घात केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भाच्या सिंचनाच्या प्रश्नांकडे, रस्ते वगैरे विकासाच्या योजनांकडे नेहमी दुर्लक्ष केले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या व इतर प्रश्नांवर सर्वप्रथम भाजपा सरकारने उपाय केले असेही श्री. अमित शाहा  म्हणाले. संविधानाची खोटी लाल प्रत हातात घेऊन मतदारांची फसवणूक करणाऱ्या राहूल गांधी यांच्या कॉंग्रेस आणि माविआला लोकांनी साथ देऊ नये, असे आवाहनही श्री अमित शाहा यांनी यावेळी केले.  

श्री. अमित शाहा पुढे म्हणाले की अंतर्विरोधाने भरलेल्या महाविकास आघाडीने सत्तेसाठी तुष्टीकरणाची विचारधारा स्वीकारली आहे. तेलंगणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक या राज्यांत निवडणूक काळात दिलेली आश्वासने काँग्रेस सरकारला पूर्ण करण्यात अपयश आले आहे. कर्नाटकमध्ये अनेक गावेच्या गावे 'वक्फ' ची मालमत्ता म्हणून घोषित झाली आहेत, सामान्य माणसाची मालमत्ता वक्फ च्या घशात जात आहे, असे सांगून श्री. अमित शाहा पुढे म्हणाले की हे रोखण्यासाठीच मोदी सरकारने वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक आणले आहे.    

महाराष्ट्रात धार्मिक आधारावर महायुतीच्या विरोधात मतदान करण्याचे फतवे काढले जात आहेत, हे फतवे आपल्याला मान्य आहेत का, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी स्पष्ट करावे असेही श्री. अमित शाहा म्हणाले.


हे संकल्पपत्र हे राज्याच्या विकासाचे दृष्टीपत्र ठरेल : सुधीर मुनगंटीवार


यावेळी प्रस्ताविक करतांना जाहीरनामा समितीचे अध्यक्ष श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की हे संकल्पपत्र हे राज्याच्या विकासाचे दृष्टीपत्र ठरेल, असा आमचा विश्वास आहे. ते पुढे म्हणाले की हे संकल्प पत्र निर्माण करतांना जाहिरनामा समितीच्या ३० सदस्यांच्या नेतृत्वात १८ उपसमित्यांमधून एकूण १९२ कार्यकर्त्यांनी आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तर या संकल्पपत्रासाठी जनतेकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यासाठी मतदारांना पंचवीस हजार पत्रे पाठविण्यात आले होते. हजारो ईमेल पाठविण्यात आले होते. व्हॉट्सअप वरूनही आवाहन करण्यात आले होते. त्यातूनच व्यापक जनसहभागाने, जनतेकडून आलेल्या हजारो सूचनांचा विचार करून आणि १८ विषयवार उपसमित्यांच्या माध्यमातून हे "संकल्पपत्र" निर्माण झाले आहे. त्यामुळे हे जनतेचे संकल्पपत्र आहे. या संकल्पपत्रासाठी 877 गावांतून ई मेल, पत्रे, व्हॉट्सअप अशा माध्यमातून 8 हजार 935 सूचना प्राप्त झाल्या. त्यात समाजातील जवळपास सर्व घटकांचा आणि सर्व वयोगटांचा समावेश होता, अशी माहितीही श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिली. महायुतीचे सरकार पुन्हा निवडून आल्यावर संकल्प पत्रातील प्रत्येक मुद्द्यांच्या अंलबजावणीसाठी विषयवार समित्या नेमल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.  महाराष्ट्र हे विश्वगौरव पंतप्रधान मा. श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेनुसार क्रमांक एकचे विकसित व लोककल्याणकारी राज्य व्हावे हे उद्दिष्ट साध्य करणारी वाटचाल या संकल्पपत्रामुळे वेगवान होईल असे ते म्हणाले.  


भाजपाचे संकल्पपत्र हे जनतेचे संकल्प साकार करणारे : देवेंद्र फडणवीस

भाजपाचे हे संकल्पपत्र हे जनतेचे संकल्प साकार करणारे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संकल्प पत्रातील प्रमुख मुद्द्यांचा आढावा घेतला. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हे संकल्पपत्र विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र तयार करण्याचा रोडमॅप आहे.  2014 मध्ये आम्ही जी आश्वासने दिली होती त्या पैकी किती पूर्ण झाली याचा अहवाल 2019 मध्ये आम्ही सादर केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याचे काम या संकल्प पत्रातून होणार आहे, असेही ते म्हणाले. 

यावेळी सूत्रसंचालन करतांना जाहीरनामा समितीचे संयोजक डॉ. श्री. विनय सहस्रबुद्धे यांनी सांगितले की  हे संकल्पपत्र ५६ पानांचे असून १४ विभागांमध्ये विभागले आहे. समाजातील सर्व घटकांना स्पर्ष करणारे आणि राज्यव्यवहारातील सर्व विषयांवर दिशादर्शन करणारे असे हे सर्वंकष संकल्पपत्र ठरेल असे ते म्हणाले. 

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

सोने भावात ३ हजारांची उसळी; सोने दर ८७ हजार पार

नाशिक| प्रतिनिधी| अमेरिकेने मेक्सिको, कॅनडा आणि चीनवर आयात शुल्क (टेरिफ) लावल्याने टेरिफ वॉर सुरू झाले आहे. चीनने ही अमेरिकेला प्रतिउत्तर देत टेरिफ लावल्याने चीन-अमेरिकेच्या टेरिफ युद्धाचा परीणाम सोन्यावर झाला असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जात आहे, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावाने नवा उच्चांक गाठला असून शुद्ध सोने दर प्रति तोळा ८४ हजार रुपयांवर वर पोहचले आहे. जीएसटीसह हा सोने भाव ८७ हजारांवर जाऊन पोहचला आहे. एका दिवसात सोने दराने ३००० रुपयांची उसळी घेतली आहे, असे सराफी व्यवसायिकांनी सांगितले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ४ फेब्रुवारीपासून मेक्सिको व कॅनडा यांच्यावर प्रत्येकी २५ टक्के आणि चीनवर १० टक्के आयात शुल्क लावले. या देशांनी अमेरिकेला तसेच प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला. व्यापार युद्धाचा भडका उडेल या भीतीने अमेरिकेने दोन पावले मागे येत मेक्सिको व कॅनडावर लावलेली टेरीफ वाढ एक महिना पुढे ढकलली आहे. मात्र चीनवर ट्रम्प यांनी १० टक्के शुल्क कायम ठेवल्याने चीनने ही अमेरिकेवर तेवढेच आयात शुल्क लावल्याने चीन आणि अमेरिकेत टेरिफ वॉर सुर...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...