Skip to main content

Posts

Showing posts from January, 2025

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सव्वा किलो सोने दान

नाशिक| देशभरातील भाविकांच्या सुवर्णदानातून साडेआठ किलोचा सुवर्ण मुकुट बनवण्याचा संकल्प वर्षभरापूर्वी करण्यात आला होता. गुरुवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे व्हाईस चेअरमन मनोज मोदी यांच्या प्रयत्नातून त्र्यंबक राजाच्या चरणी सव्वा किलोचे सुवर्णदान करण्यात आले व सुवर्ण मुकुट बनवण्याच्या संकल्पनेला हातभार लावला. भाविकांच्या दानातून त्र्यंबक राजासाठी साडेआठ किलोचा सुवर्ण मुकुट बनवण्यात येणार असल्याचे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी सांगितले. मागील महिन्यात मनोज मोदी हे त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते, तब्बल २०० वर्षांपूर्वीचा सुवर्ण मुकुट नवीन बनवण्याचा संकल्प त्यांना सांगण्यात आला होता. देशभरातील  भाविकांच्या सुवर्णदानतून साडेआठ किलोचा सुवर्ण मुकुट बनवण्याचा संकल्प वर्षभरापूर्वी करण्यात आला होता. त्यात सर्व भाविकांचा हातभार असावा असे देवस्थानतर्फे ठरवण्यात आले.  त्याप्रमाणे सुवर्णदानातून पाच किलोपेक्षा जास्त सोने देवस्थानकडे जमा झाले आहे. मनोज मोदी यांनी उरलेले सोने मी स्वतः देतो असे कबूल केले होते, परंतु अजूनही काही भाविक महाशिवरात्रीपर्यंत सोने दl...

नाशिक 'रन' मध्ये धावले हजारो नाशिककर

नाशिक| समाजातील गरजूंसाठी २३ व्या नाशिक रन मध्ये  शनिवारीच्या गुलाबी थंडीत हिरवे टी-शर्ट परिधान करून  हजारो नाशिककर धावले. तसेच समाजसेवी उपक्रमास स्वयंस्फूर्तीने हातभार लावला. यात पाच हजारहून अधिक नागरिकांनी आपला सहभाग घेतला होता.  महात्मा नगर क्रीडांगणावर झालेल्या या रनच्या उपक्रमास  व्यासपीठावर   नाशिक रन चे अध्यक्ष प्रबल रे, उपाध्यक्ष मुकुंद भट, सचिव अनिल दैठणकर, खजिनदार राजाराम कासार, नाशिक रन चे  विश्वस्त  श्रीकांत चव्हाण, अविनाश देशपांडे, रमेश शालिग्राम, तेजिंदरनाथ, अशोक पाटील,  जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  राजश्री गुंड,  माजी विश्वस्त एच एस बॅनर्जी, रमेश जीआर, सलील राजे, एच बी थोंटेश,  सुधीर येवलेकर,  बॉश इंडियाचे अध्यक्ष गुरुप्रसाद मुदलापूर, ख्रिटोप वर्सनेर , राकेश देसाई, एपीरॉक कंपनीचे महाव्यवस्थापक डॉक्टर कॅथरीना कोलकिंग, मनुष्यबळ विकास महाव्यवस्थापक पल्लवी पांडे, सोल्युशन चे जॉय अलुर, सुधीर मुतालिक, शशांक बेथारिया, थायसन कृप  चे  रवींद्र यादव, सॅमसोनाई...

सराफांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा: सराफ व्यवसायिकांच्या चर्चासत्रात सूर

नाशिक|प्रतिनिधी|सराफ व्यवसायिकांनी जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शकता आणि ग्राहकपयोगी सेवेवर अधिक भर द्यावे,असे मत ज्येष्ठ सराफी व्यवसायिक अनिल दंडे व राजेंद्र दिंडोरकर यांनी मांडले. या चर्चासत्रात २५ संघटनांचे पाचशेवर सभासद सहभागी झाले होते. शहरात इंडीयन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन उत्तर महाराष्ट्र बोर्ड (IBJA) आयोजित सराफ व्यावसायिकांचे चर्चासत्र नुकतेच झाले. त्याप्रसंगी गिरीश नवसे, श्याम बिरारी, निलेश सराफ, राहुल महाले, इंडियन बुलियन असोसिएशनचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष व कार्यक्रम संयोजक चेतन राजापुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला.  या कार्यक्रमात आनंद क्षेपकल्याणी व मनिषा क्षेमकल्याणी यांनी २४ कॅरेट व २२ कॅरेट सोने यावर परिसंवाद घेऊन मार्गदर्शन केले. सराफी व्यासायिकांच्या या चर्चासत्रात २५ संघटनांचे ५०० सभासद सहभागी झाले होते. यशस्वी सराफ व्यावसायिकाचा प्रवास या कार्यक्रमाचा माध्यमांतून उलगडण्यात आला. त्याअनुषंगाने नाशिकचे प्रसिद्ध सराफी व्यावसायिक श्याम दुसाने लिखित 'सोनेरी प्रवास' या...