Skip to main content

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले. 

डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. 

सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले असून, एरिस सॉफ्टवेअर सोल्युशन  यांच्या सौजन्याने त्याचे प्रायोजित करण्यात आले आहे. दररोज हजारो भाविकांची वर्दळ असणारे तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर हे उच्च प्राधान्याचे ठिकाण म्हणून निवडण्यात आले आहे. अचानक हृदयविकाराच्या झटक्याच्या प्रसंगी तात्काळ एईडी उपलब्ध असणे अनेकांचे प्राण वाचवू शकते.

विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन व नामांकित हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विक्रांत विजन म्हणाले, आगामी कुंभमेळ्याच्या काळात AED उपलब्ध नसल्यामुळे एकही मृत्यू होऊ नये, हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच डॉ. सृष्टी विजन यांनी अचानक हृदयविकाराच्या झटक्यात त्वरित प्रतिसादाचे महत्त्व विषद  करुन उपचाराविषयी व उपकरणाविषयी माहिती दिली.

अचानक हृदयविकार कुठेही होऊ शकतो, अगदी देवळांसारख्या पवित्र ठिकाणीही. पहिल्या काही मिनिटांत दिलेले डिफिब्रिलेशन प्राण वाचवू शकते. त्यामुळे गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी AED बसविणे अत्यंत आवश्यक आहे. असे सांगण्यात आले.

शहरात शंभर उपकरण बसविण्याचे उद्दिष्ट

विजन हॉस्पिटलच्या सामाजिक उपक्रमांतर्गत स्थापन झालेल्या विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनची स्थापना डॉ. विनोद विजन आणि डॉ. विक्रांत विजन यांनी केली आहे. फाउंडेशनचे उद्दिष्ट नाशिक शहरात १०० AED बसविण्याचे असून, आतापर्यंत शाळा, महाविद्यालये, कार्यस्थळे, निवासी संकुले व विविध सार्वजनिक संस्थांमध्ये हजारो नागरिकांना मोफत CPR प्रशिक्षण देण्यात आले आहे.

याशिवाय, डॉ. विनोद विजन यांनी कुंभमेळा प्राधिकरणाअंतर्गत कार्यरत कुंभाथॉन इनोव्हेशन फाउंडेशन यांच्या सहकार्याने एक अभिनव प्रकल्प सुरू केला असून, त्याअंतर्गत ड्रोनद्वारे AED व आपत्कालीन वैद्यकीय मदत पुरविण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनने शैक्षणिक संस्था, निवासी सोसायट्या, सामाजिक संस्था तसेच दानशूर व्यक्तींना AED प्रायोजित करण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ किंवा पसंतीच्या सार्वजनिक ठिकाणी AED बसवून या जीवनरक्षक मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“AED सहज उपलब्ध असलेले देशातील पहिले शहर नाशिक बनवणे, हेच आमचे स्वप्न आहे,” असे फाउंडेशनने नमूद केले आहे. अध्यक्ष प्राची घुले,सचिव राहुल पाटील,विश्वस्त पुरूषोत्तम कडलग ,कैलास घुले,सत्यप्रिय शुक्ला ,मनोज थेटे स्वप्नील शेलार,प्रदीप तुंगार ,रुपाली भुतडा आदींचे सहकार्य लाभले.


कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन सारख्या शैक्षणिक संस्था, निवासी सोसायट्या, सामाजिक संस्था तसेच दानशूर व्यक्तींना AED प्रायोजित करण्याचे आवाहन करतो.

:-पुरुषोत्तम कडलग, विश्वस्त


Popular posts from this blog

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...