Skip to main content

डिजिटल लर्निंगचे धडे गिरवूया, स्मार्ट विद्यार्थी घडवूया!

 Brixlelant फाउंडेशन सेवाभावी सामाजिक संघटना आहे.ही संस्था अमेरिकेतील अनिवासी तरुणांच्या प्रोत्साहन आणि प्रयत्नातून उदयास आली आहे. तिचे मुख्य कार्यालय पुणे येथे आहे. संस्थेने सामाजिक बांधीलकी जोपासण्याच्या हेतूने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांना डिजिटल ई-शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी क्यूजली (Qeasily) नावाचे ऍप आणले आहे. ऑनलाइन शिक्षणावर भर देत स्मार्ट विद्यार्थी आणि स्मार्ट शाळा घडवण्याच्या मार्ग दाखवण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे 
Lets-Learn-Digital-Learning-Lessons-Build-Smart-Schools-and-Smart-Students
 त्यासाठी ब्रिक्सेलेंट Qeasily.com या कंपनीचे सहकार्य घेतले आहे, संस्थेने घोषणा केली आहे की डिजिटल शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी आगामी काळात 1 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. ब्रिक्सेलेंट अभ्यासक्रमावर आधारित सर्वसामग्री ही शाळा आणि विद्यार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य , डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देेत आहे. त्यातून विद्यार्थी शाळा, शिक्षक यांना एक व्यासपीठ आणि आवश्यक अभ्यासक्रमाचे समाधान प्राप्त करता येणार आहे, त्याला विद्यार्थी, शिक्षक  व शाळेच्या विश्वस्तांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. 

 क्यूइझिलीचे 50 हजार वापरकर्ते

Lets-Learn-Digital-Learning-Lessons-Build-Smart-Schools-and-Smart-Students
संस्थेने घोषणा  केली आहे, की डिजिटल शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी आगामी काळात 1 मिलियन डॉलरची गुंतवणूक केली जाणार आहे. ब्रिक्सेलेंट अभ्यासक्रमावर आधारित सर्वसामग्री ही शाळा आणि विद्यार्थ्यांना पूर्णपणे विनामूल्य व डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देेत आहे. त्यातून विद्यार्थी शाळा, शिक्षक यांना एक व्यासपीठ आणि आवश्यक अभ्यासक्रमाचे समाधान प्राप्त करता येणार आहे,  त्याला विद्यार्थी,शिक्षक आणि शाळेच्या विश्वस्तांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.  आतापर्यंत ऍपवर 50 हजार वापरकर्त्या विद्यार्थ्यांची संख्या नोंदवली गेली आहे. 

ही सेवा सर्वांसाठी विनामूल्य आणि डिजिटल शिक्षणास पाठिंबा देण्यासाठी महत्वाची ठरेल त्यासाठी अतिरिक्त पाठ्यक्रम अभ्यासक्रमांचा कॅटलॉग बाजारात आणण्याची ही कंपनीची प्रक्रिया सुरू आहे. असे न्यूयॉर्क मधील संस्थापक मिलिंद महाजन यांनी दिलेल्या यांनी म्हटले आहे, महसूल हा आमच्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा असला तरी आमचे मुख्य लक्ष विनामूल्य शिक्षण उपलब्ध करण्यावर आहे. जे शाळा आणि विद्यार्थ्यांना सक्षम बनवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Lets-Learn-Digital-Learning-Lessons-Build-Smart-Schools-and-Smart-Students
Add caption

Lets-Learn-Digital-Learning-Lessons-Build-Smart-Schools-and-Smart-Students

क्यूइझिली कंपनी इतर कंपन्यांपेक्षा भिन्न आहे, ज्यात भाषेसह सर्व प्रकारच्या व्यापक सामग्रीवर Qeasily. Com क्यूइझिलीने लक्ष केंद्रित केले आहे. दहा लाखा-पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असलेल्या 800 हुन अधिक शाळांची मान्यता मिळण्यास आम्ही यशस्वी झालो असे संस्थापक अरविंद सोनवणे म्हणाले, "जमा झालेल्या पैशांचा अंशतः उपयोग यूजरबेससाठी केला जाईल." त्याने आणखी  विद्यार्थी  जोडले जातील,  सद्या किफायतशीर इंटरनेट, स्मार्टफोनची विस्तृत उपलब्धता आणि जागरुकता वाढल्याने शाळा आणि पालकांना आपल्या मुलांना चांगली संधी उपलब्ध करुन देता येणार आहे,  परंतु सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सोल्यूशन्सची किंमत ही मोठी अडथळा ठरत आहे.


Lets-Learn-Digital-Learning-Lessons-Build-Smart-Schools-and-Smart-Students

महिला सक्षमीकरणाला चालना

 ब्रिक्सेलेंटची आणखी एक मूळ संस्थापक वैशाली वाघ ही गृहिणी उद्योजक बनत तीने ही शून्यापासून व्यवसाय सुरु केला आहे. सुरुवातीच्या दिवसापासून ती संस्थेचा भाग आहे आणि भारतीय महिलांना काय साध्य करता येईल हे त्यांनी दाखवून दिले आहे. ही महिला सक्षमीकरणाची वास्तविक जीवनातील घटना आहे.

Lets-Learn-Digital-Learning-Lessons-Build-Smart-Schools-and-Smart-Students

संस्थापक मिलिंद महाजन, स्वाती महाजन, अरविंद सोनवणे, वैशाली वाघ यांच्यासह उपस्थित कुणाल सुतार, सचिन नाफडे, जयेश पाटील, अतुल सोनगीरकर, भूषण सावला, वंदना इटगी, चैताली बागुल, अश्विनी माळोदे, विद्या भोकरे, नितीका पाटील, कुणाल पाटील, संकेत काकडे, सचिन अटकरे, दिनेश साळवी आदी.(फोटो:टीम ब्रिक्सेलेंट)


Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...