Skip to main content

राज्यभरात 365 रुग्ण बरे : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई। आज राज्यात कोरोनाबाधीत ३२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ३६४८ झाली आहे. आज दिवसभरात ३४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३६५ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३०७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
Corona-virus-covid-19
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६७ हजार ४६८ नमुन्यांपैकी ६३ हजार ४७६ जणांचे कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर  ३६४८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८२ हजार २९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६९९९ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आज राज्यात ११ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २११* झाली आहे. (* यापुर्वी ११ एप्रिल रोजी कळवलेला एक मृत्यू कोरोना निगेटिव्ह असल्याचे मुंबई मनपाने कळवल्याने सदर मृत्यू एकूण मृत्यूमधून वगळण्यात आला आहे.) आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील ५ आणि पुणे येथील ४ तर १ मृत्यू औरंगाबाद मनपा आणि १ मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. त्यात ६ पुरुष तर ५  महिला आहेत. त्यामध्ये  ६० वर्षे किंवा त्यावरील  ५ रुग्ण आहेत तर ६  रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत.  मृत्यूमुखी पडलेल्या ११ जणांपैकी ९ रुग्णांमध्ये (८२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)मुंबई महानगरपालिका: २२६८ (१२६)ठाणे: १८ (२)ठाणे मनपा: ११६ (२)नवी मुंबई मनपा: ६५ (३)कल्याण डोंबवली मनपा: ७३ (२)उल्हासनगर मनपा: १भिवंडी निजामपूर मनपा: ४मीरा भाईंदर मनपा: ६४ (२)पालघर: २१ (१)वसई विरार मनपा: ६२ (३)रायगड: १३पनवेल मनपा: २९ (१)ठाणे मंडळ एकूण: २७३४ (१४२)नाशिक: ३नाशिक मनपा: ५मालेगाव मनपा:  ४५ (२)अहमदनगर: १९ (१)अहमदनगर मनपा: ९धुळे: १ (१)धुळे मनपा: ०जळगाव: ०जळगाव मनपा: २ (१)नंदूरबार: ०नाशिक मंडळ एकूण: ८५ (५)पुणे: ११ (१)पुणे मनपा: ५२८ (४९)पिंपरी चिंचवड मनपा: ४५ (१)सोलापूर: ०सोलापूर मनपा: १४ (१)सातारा: ११ (२)पुणे मंडळ एकूण: ६१६ (५४)कोल्हापूर: २कोल्हापूर मनपा: ३सांगली: २६सांगली मिरज कुपवाड मनपा:०सिंधुदुर्ग: १रत्नागिरी: ६ (१)कोल्हापूर मंडळ एकूण: ३८ (१)औरंगाबाद:०औरंगाबाद मनपा: २९ (३)जालना: २हिंगोली: १परभणी: ०परभणी मनपा: १औरंगाबाद मंडळ एकूण: ३३ (३)लातूर: ८लातूर मनपा: ०उस्मानाबाद: ३बीड: १नांदेड: ०नांदेड मनपा: ०लातूर मंडळ एकूण: १२अकोला: ७ (१)अकोला मनपा: ८अमरावती: ०अमरावती मनपा: ६ (१)यवतमाळ: १३बुलढाणा: २१ (१)वाशिम: १अकोला मंडळ एकूण: ५६ (३)नागपूर: २नागपूर मनपा: ५८ (१)वर्धा: ०भंडारा: ०गोंदिया: १चंद्रपूर: ०चंद्रपूर मनपा: २गडचिरोली: ०नागपूर मंडळ एकूण: ६३ (१)इतर राज्ये: ११ (२)एकूण: ३६४८  (२११)(या तक्त्यातील रुग्ण संख्या रुग्णाने दिलेल्या पत्त्यानुसार आहे. काही रुग्णांचे प्रत्यक्ष वास्तव्य वेगळीकडे असू शकते. जिल्हा, मनपांनी उपलब्ध करून दिलेल्या पत्त्यानुसार रुग्णसंख्येत बदल झालेला आहे. चंद्रपूर मनपातील रुग्ण हे परदेशात संसर्गग्रस्त झालेले आहेत.)
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या   ३४४ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण ५९९४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी २३ लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. 

अजय जाधव

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...