Skip to main content

नाशिकला कोरोना टेस्टिंग लॅब कार्यान्वित होणार

नाशिक। प्रतिनिधी: जिल्ह्यात कोविड-१९  रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी नाशिक मध्ये कोरोना विषाणू टेस्टिंग लॅब सुरू करण्यात यावी यासाठी नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे प्रयत्न आहेत. त्यानुसार आय.सी.एम.आर कडून व्हिडीओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज मधील लॅबची पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली असून लवकरच ही लॅब कार्यान्वित होणार आहे.

Korona-testong-lab

कोरोना संशयित रुग्णांची तपासणी करण्यासाठी आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज,पुणे  या लॅबची मदत घ्यावी लागत असल्याने चाचणी अहवाल येण्यामध्ये अधिक वेळ जात आहे. नाशिकमध्ये कोरोना तपासणी लॅबला परवानगी मिळावी यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत भुजबळांनी मागणी केली होती. तसेच नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा सदर लॅब बाबत आवश्यक पूर्तता करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याबाबत भुजबळांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी वेळोवेळी चर्चा देखील केली असून लॅब सुरू करण्याबाबत सातत्याने संपर्क सुरू होता. दि.१३ एप्रिल रोजी मंत्री मंडळ उपसमितीच्या बैठकीत नाशिकची लॅब प्रथम प्राधान्याने चालू करून द्यावी अशी सूचना छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार मंत्री राजेश टोपे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ.संजय मुखर्जी यांना नाशिकच्या लॅब मध्ये लक्ष घालण्याचे निर्देश दिले होते.  
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राष्ट्रीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेने लॅबच्या परवानगीचे अधिकार पुणे आणि नागपूर केंद्राला दिले आहेत. त्यानुसार आय.सी.एन.आर च्या अधिकाऱ्यांनी मविप्र येथील मेडिकल कॉलेजच्या लॅबची व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पाहणी केली आहे. सदर प्रयोगशाळेसाठी  अतिरिक्त आवश्यक यंत्रसामुग्री  नाशिकच्या दातार लॅब येथून नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी उपलब्ध करून दिले आहे. तसेच यासाठी लागणाऱ्या मायक्रोबायोलॉजी तज्ज्ञांना नागपूर येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षण घेऊन हे तज्ञ लवकरच नाशिक येथे येणार असून लवकरच मविप्र मेडिकल कॉलेज येथील कोरोना टेस्टिंग लॅब सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिकमधील रुग्णांचे अहवाल तातडीने मिळण्यास मदत होणार असून जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावावर  नियंत्रण येण्यास मदत होणार आहे

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...