Skip to main content

Covid-19: जगभरात कोरोनामुळे दिड लाखावर मृत्यू

अँकर वृत्तसेवा। कोरोना महामारीने जगाला आपल्या विळख्यात घेतले असून जगभर कोरोनाने 22 लाख 41 हजार 359 लोक आतापर्यंत बाधीत झाले आहे.तसेच जगातील मृतांचा आकडा (1,52,551)  दिड लाखाच्या वर पोहचला आहे. 24 तासात  नव्याने 81 हजार 153 लोक बाधीत झाले आहे. तर अमेरिका 2043, यूके 888 आणि स्पेनमधील 565 लोकांना नव्याने जीव गमवावा लागला आहे. जगात सर्वाधिक अमेरिकेत जवळपास 7 लाख लोक बाधीत आहे.

Covid-19-corona-virus

Photo: file

युरोप आणि अमेरिका खंडात सर्वाधिक बाधीत लोक आहेत. युरोपात 11,22,189 लोक बाधीत आहेत,24 तासात 35300 लोक नव्याने बाधीत झाले आहे तर आतापर्यंत ऐकूण मृत्यूचे प्रमाण 1,00,938 वर पोहचले असून युरोपात नव्याने 3737 लोकांचा मृत्यू झाला आहे. युरोपात स्पेन मध्ये 191726 इतके सर्वाधिक बाधीत असून 20043 लोकांना आतापर्यत जीव गमवावा लागला आहे त्यात स्पेनमध्ये 24 तासात 565 लोकांचा मृत्यू झालाय.इटलीत ऐकूण 175925 लोक बाधीत असून आतापर्यंत 23227 लोकांनी जीव गमवला आहे, नव्याने 480 लोकांचा मृत्यू झालाय. जर्मनीत 4294 तर यूकेत 15464 लोकांनी आतापर्यंत जीव गमवला असून युकेत नव्याने 888 लोकांचा मृत्यू झाला. 24 तासात अमेरिकेनंतर ही सर्वात मोठी आकडेवारी आहे.अमेरिकेत नव्याने 24 तासात 2043 लोकांनी जीव गमवला आहे. अमेरिकेत सर्वाधिक 6,95,353 लोक बाधीत आहेत. आतापर्यंत 32427 लोकांनी जीव गमवला आहे. त्यानंतर ब्राझिल 33682 लोक बाधीत तर 2141 लोक मृत्यू पावलेत. कनाडात 32 हजार बाधीत झाले असून 1346 लोकांचा मृत्यू झाला आहे.

प्रशांत क्षेत्रात येणाऱ्या चीनमध्ये 84201 बाधीत लोक आहेत, त्यात नव्याने केवळ 21 जणांची भर पडली आहे, तर आतापर्यंत 4642 लोकांनी जीव गमवला आहे. नव्याने  मृत्यूचे प्रमाण शून्य आहे. त्यामुळे चीनने या महामारीला नियंत्रित केले आहे. दक्षिण कोरिया, जापान, ऑस्ट्रेलिया, फिलीपाइन्स, सिंगापूर, मलेशिया यांनी देखील कोरोनावर नियंत्रण मिळवल्याचे दिसते. पूर्वमध्य क्षेत्रात इराण मध्ये 80 हजार लोक बाधीत झाले, तर आतापर्यंत 5031 लोकांचा जीव गेला आहे. दिलासादायक म्हणजे नवीन फक्त 73 रुग्ण आढळून आले. सऊदी अरब, पाकिस्तान, यूएई, कतार येथे ही मृत्यूचे प्रमाण कमी दिसते.

दक्षिणपूर्व आशियात 27319 लोक बाधीत आहेत. तर 1185 लोकांनी आतापर्यंत जीव गमविला आहे. भारतात 15712 लोक बाधीत आहेत, नवीन 1334 पॉझिटीव्ह आढळले आहे, 507 लोकांना जीव गमवावा लागला आहे. इंडोनिशियात 6248 बाधीत तर 535 लोकांचा मृत्यू झाला आहे. थायलंड आणि बांग्लादेशात 2 हजारावर रुग्ण बाधीत आहेत. मृतांचा आकडा शंभराच्या आत आहे. आश्चर्य म्हणजे बुद्धिष्ठ लोकसंख्या असलेल्या देशात मृत्यूचे प्रमाण शून्य आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...