Skip to main content

...तो आला, उपचारार्थ राहिला आणि बरा होऊन घरी गेला; सिव्हिलच्या डॉक्टरांचे यश

तबरेज शेख/ दिगंबर मराठे 
नाशिक। दिवसरात्र रुग्ण सेवेला वाहून घेणारे आणि रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. असे मानणाऱ्या डॉक्टरांची खरी गरज आपल्याला आहे.  तेच काम जिल्हा रुग्णालयाची टीम करत आहे त्यांनी नाशिककरांचा आणि रुग्णाचा विश्वास सार्थ ठरवला आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता, येणाऱ्ऱ्या प्रत्येक रुग्णाच्या सेवेत व्यस्त असलेली सर्व डॉक्टर, नर्स आणि त्यांना सहाय्य करणारी  टीम चांगले काम करत आहे. स्वत:ला सांभाळून दरदिवशी  येणाऱ्या प्रत्येक संकटाला सामोरं जात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे परपाडत आहे. 

First-corona-paient-recoverd
फोटो: उदय रांजणगावकर


रुग्णाला मानसिक आधार देत त्याला कणखर करुन त्याला बरे करणे म्हणायला सोपे असले तरी खरे तेच अवघड काम आहे. पण प्रत्येक अवघड काम एक आव्हान म्हणून स्विकारायचे आणि त्यात विजय मिळवायचाच असा आत्मविश्वास त्यांच्यात दिवसागणिक वृध्दीगत होत आहे. म्हणून सर्व टीमच्या धाडसाला आणि जिद्दीला सलाम करावा लागेल, कोरोना विषाणू महामारीला पराभूत करण्याचा विडा जिल्हा रुग्णालयाच्या चमूने उचलला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्या नेतृत्वात  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निखिल सैंदाने, डॉ. प्रमोद गुंजाळ, डॉ. गणेश चेवले आणि  नर्स, इतर स्टाफ यांनी 24 तास रुग्ण सेवेला वाहून घेत कर्तव्याला प्राधान्य दिले आहे.

नाशिकाला किरोना बाधितांची संख्या आटोक्यात ठेवणे याकडे विशेष लक्ष पुरवण्यात आले. लासलगाव येथून  29 मार्चला एक संशयित रुग्ण दाखल झाला. त्याआधी 25 मार्चला त्याच्यात कोरानाची लक्षणे आढळली 27 मार्चला त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. अत्यंत कुशलतेने त्याला डॉक्टरांनी हाताळले, त्याला कोरना कक्षात  ठेवून 16 दिवस उपचार करण्यात आले. डॉक्टर आणि त्यांच्या सहकारी स्टाफने त्यासाठी विशेष मेहनत घेतली तसेच रुग्णाने  उपचारादरम्यान चांगला प्रतिसाद दिल्याने, पॉझिटिव्ह असलेला हा युवक बरा होऊन, त्याला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी टाळ्या वाजवून त्याला निरोप देण्यात आला. मात्र डॉक्टर आणि त्यांच्या टीमने पुन्हा स्वत:ला कामात झोकून दिले आहे, त्यामुळे सिव्हिल सध्याच्या संकट काळात सर्वसामान्य गरीब आणि गरजू रुग्णाचा एकमेव आधारस्तंभ आहे जे रुग्णाच्या सेवेला ईश्वर सेवा मानत आहे. 


डॉ.चेवले यांनी दिला आठवणीना उजाळा

Dr-chevle
डॉ.गणेश चेवले
साधारण तीन ते चार वर्षा पूर्वी एच1एन1 स्वाइन फ्ल्यू आजाराच्या काळातील परिस्थिती आठवली. त्यावेळी स्वाइन फ्ल्यू कक्षात कार्यरत होतो.  रुग्णावर उपचार करतांना  स्वाइन फ्ल्यूची लागण झाली. साहजिकच घरच्यांना काळजी वाटली पण डॉ. चेवले यांनी परिस्थिती संयमान हाताळली, स्वत:ला कुटुंबापासून काही काळ वेगळे ठेवले. घरात कॉरंटाइन होत त्यांनी स्वत:ला बरे केले आणि  हाच अनुभव आता काम करतांना कामी आल्याचे सांगितले. इतरांशी संपर्क टाळा आणि शासनाचे निर्देश पाळण्याचे आवाहन त्यांनी केले.

                

                 रुग्णाचा चांगला प्रतिसाद

Dr-gujal
डॉ. प्रमोद गुंजाळ
रुग्ण आला तेव्हा त्याच्यात ताप आणि निमोनियाचे लक्षण आढळले त्याच्यावर कशा प्रकारे उपचार करायचे याची तयारी झालेली होती. रुग्णाने उपचाराला चांगला प्रतिसाद दिल्याने ही आमचे काम सोपे झाले. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आल्याचे डॉ. प्रमोद गुंजाळ यांनी सांगितले.












Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...