Skip to main content

कन्नडचे मा.आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणातून संन्यास

औरंगाबाद/प्रतिनिधी: केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राज्याच्या राजकारणातून संन्यास घेत पत्नी रंजना हर्षवर्धन जाधव यांना राजकीय वारसदार जाहीर केले आहे.  
Harshvardhan-jadhav
फोटो क्रेडिट:भास्कर निकाळजे
अधिक माहिती अशी,  माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे कन्नडचे माजी मंत्री कै. रायभान जाधव यांचे पुत्र आहेत. रायभान जाधव यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगली कामे केली. याचा फायदा पुत्र हर्षवर्धन जाधव यांना झाला. जाधव हे दोन वेळा आमदार झाले. शिवसेनेत असताना आणि पुढे मनसेत दाखल होताच त्यांना तिकिट दिले गेले. माञ पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर.आर.पाटील असताना त्यांच्या ताफ्यात वाहन घुसवले असता त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे प्रकरण घडले होते. 

त्यानंतर त्यांनी पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टिका केल्याने त्यांना पक्षातून काढण्यात आले. जाधव यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सेनेचे अधिकृत उमेदवार सलग तीन वेळा खासदार झालेले चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत अपक्ष रिंगणात उतरल्यामुळे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार ईम्तियाज जलील हे खासदार म्हणून निवडून आहे. मतांचे विभाजन झाल्याने सेनेत नाराजी होती. पुढे झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने तिकिट कापल्याने हर्षवर्धन कन्नड मतदार संघातून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले मात्र लोकसभेचा बदला म्हणून सेनेने त्यांचा पराभव केला.निवडणूक प्रचार काळात ठाकरे घराण्यावर टिका केली.

त्यानंतर त्यांच्या बंगल्यावर अज्ञात लोकांनी दगडफेक ही केली होती.  त्यातच त्यांनी सासरे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावरही टीका केली.  मधल्या काळात त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाची स्थापना केली. परंतु काही कारणास्तव पक्ष वाढला नाही. काही महिन्यापूर्वी किरकोळ कारणातून त्यांच्यावर अॕट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला, अशा परिस्थिती पक्ष वाढविणे, कार्यकर्ते सांभाळणे कठीण झाले. सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे आणि याच परिस्थितीच त्यांनी सोशल मीडियात व्हिडिओच्या माध्यमातून आपला दोन दशकाचा राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने राजकारणात चर्चेला उधाण आले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...