Skip to main content

फेसबुक लाईव्हद्वारे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांचा औरंगाबादकरांशी संवाद; कोरोनामुक्ती लोकचळवळ व्हावी: चौधरी

औंरगाबाद/प्रतिनिधी: कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी एकमेकांपासून शारिरीक अंतर किमान सहा फुटाचे ठेवा. मास्कचा वापर करा. वारंवार हात साबणाने धुवा या त्रिसूत्रीचा वापर कराच, हा संदेश ‍जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज प्रथमच केलेल्या फेसबुक लाईव्हद्वारे औरंगाबादकरांशी संवाद साधताना दिला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कोरोनामुक्त लोकचळवळीसाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
Covid-19-corona-virus
कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. लोकांनीही सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासनाला सहकार्य केले आहे. परंतु अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही, त्यामुळे खबरदारी घ्यावीच लागेल. खबरदारीसाठी पल्स ऑक्सिमीटरच्या माध्यमातून शरिरातील आक्सिजनची पातळी तपासता येते. नियमितपणे तपासल्यास संभाव्य धोका टळू शकतो. मात्र, यामुळे कोरोना होणारच नाही, असे नाही. हा केवळ खबरदारीचा उपाय आहे. याचा वैद्यकीय पातळीवर उपचार घेताना बऱ्याच प्रमाणात उपयोग होऊ शकतो. त्यामुळे 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी या ऑक्सिमीटरचा वापर करावा. वापर करण्याची पद्धत प्रात्यक्षिकाद्वारे  चौधरी यांनी दाखवली. पल्स ऑक्सिमीटरच्या माध्यमातून आपले आरोग्य आपल्या हाती या प्रमाणे आपणच आपली तपासणी करून  शरिरातील ऑक्सिजनचे प्रमाण, पल्स रेट तपासू शकता असेही  चौधरी  म्हणाले.

फेसबुक लाईव्हद्वारे प्रथमच संवाद साधत असलेल्या उदय चौधरी यांना औरंगाबादकरांनीही थेट प्रश्न विचारले. त्यांनी ही मनमोकळेपणाने त्यांच्या प्रश्नांची उत्तरे ‍देऊन त्यांचे समाधान केले. यामध्ये ग्रामीण भागातील लॉकडाऊन, शहरातील बस सेवा, हॉटेल, उद्योग सेवा आदींबाबत प्रश्न विचारण्यात आली. बाहेरगावाहून आल्यानंतर किती दिवस घरात अलगीकरणात रहावे, असाही प्रश्न विचारण्यात आला. यावर जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी बाहेर गावावरून येणाऱ्या व्यक्तीने वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. तसेच वैद्यकीय सल्ल्यानुसार घरातच 14 दिवस अलगीकरणात रहावे, असे सांगितले.औरंगाबाद शहर वगळता औरंगाबाद ग्रामीण क्षेत्रात उद्योग व्यवसायाला कुठल्याही प्रकारच्या परवानगीची आवश्यकता नाही. परंतु जर व्यवसायासाठी संबंधित शहरातून ये-जा करत असतील तर मात्र, अडचण निर्माण होऊ शकते, असेही ते म्हणाले. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा, ‍जि.प. यंत्रणा चांगल्याप्रकारे काम करत आहे. त्यांच्यावर संनियंत्रण करून या कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी सर्वोतोपरी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे आता औरंगाबादमध्ये बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचेही श्री. चौधरी यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले.शेतकरी बांधवांना अडचणी येणार नाहीत, यासाठी यंत्रणा काम करत आहेत. ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्रे सुरू करावीत, असे निर्देशही त्यांनी लाईव्हद्वारे संबंधितांना दिलेत.

खासगी रुग्णालयातही महात्मा फुले जनआरोग्या योजनेच्या माध्यमातून आता नि:शुल्क उपचार 31 ऑगस्टपर्यंत घेता येणार आहेत. परंतु काही रुग्णालये या योजनेंतर्गत नोंदणीकृत नसतील त्याठिकाणी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसारच दर आकारणी करणे रुग्णालयास बंधनकारक असेल. याबाबत काही अडचण असल्यास आरोग्य विभागाच्या 104 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा. ज्या रुग्णालयाने रुग्णांकडून अतिरिक्त दर आकारणी केली अशा रुग्णालयांकडून राज्य सरकारने रक्कम वसूल करून रुग्णांना परत केली आहे, त्यामुळे अधिकची दर आकारणी होत असेल तर प्रशासनास तत्काळ कळवावे, त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. तसेच उपचारापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची ग्वाहीही श्री. चौधरी यांनी दिली.शेतकऱ्यांना बांधावर खत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने पावले उचलली आहेत. औरंगाबाद शहर वगळता ग्रामीण भागात जिल्ह्यांतर्गत बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच अशा कठीण प्रसंगात सर्वांनी शासनाच्या नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही यावेळी केले.
                                       


Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...