- चीनी कंपन्या हुवावे आणि जेट कॉर्पोरेशनला ५ जी प्रक्रियेतून बाहेरचा रस्ता दाखवा: व्यापारी महासंघ - TheAnchor

Breaking

July 6, 2020

चीनी कंपन्या हुवावे आणि जेट कॉर्पोरेशनला ५ जी प्रक्रियेतून बाहेरचा रस्ता दाखवा: व्यापारी महासंघ

नाशिक|अखिल भारतीय व्यापारी महासंघाने केंद्र सरकारला चीनी कंपन्या हुवावे आणि जेट कॉर्पोरेशनला 5 जी नेटवर्क प्रक्रियेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याची मागणी केले आहे.
Aijhf
फोटो: एआयजेएफ
आत्मनिर्भर भारत बनवण्याच्या मोहिमेत सहभागी होत, तसेच चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याच्या राष्ट्रीय मोहिमेचा एक भाग म्हणून अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (CAIT) केंद्र सरकारकडे अशी मागणी केली आहे की, देशात अस्तित्वात येणाऱ्या 5 जी नेटवर्कच्या प्रक्रियेतून चीनी कंपन्या हुवावे आणि जेट कॉर्पोरेशनला पूर्णपणे वगळावे अशी मागणी केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री  रविशंकर प्रसाद यांना अखिल भारतीय व्यापारी महासंघाने पत्राद्वारे (CAIT) केली आहे,

त्यात त्यांनी म्हटले आहे, भारताचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय सुरक्षा आणि लोकांच्या वैयक्तिक डेटाची सुरक्षा लक्षात घेता या दोन्ही कंपन्यांना 5 जी नेटवर्कमध्ये सहभागी करुन घेऊ नये! दुसरीकडे, कॅटच्या मोहिमेस पाठिंबा मिळत असून अनेक क्षेत्रांतील व्यापारी आणि उद्योगपतींनीही चिनी कंपन्यांशी असलेला चालू व्यापार संपवण्यासाठी आवश्यक पावले उचलेली आहेत, आता ते चीनविरूद्ध आर्थिक निर्बंधासाठी देश एकत्रित होत असल्याचे स्पष्ट संकेत आहे. असे सीएआयटी-एआयजेजीएफचे प्रवक्ता आणि संस्थापक सदस्य नितीन केडिया आणि मेहुल थोरात यांनी सांगितले आहे.