Skip to main content

नागरिकांनी नियमांचे पालन केले तरच कोरोनाला अटकाव शक्य: पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक|येवला| नागरिकांनी नियमांचे पालन काटेकोरपणे केले तरच कोरोनाला अटकाव शक्य असल्याचे सांगत कोरोनाला अटकाव घालण्यासाठी कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी सुरू ठेवावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
Chhagan-bhujbal
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि नियोजनाबाबत आज ना.छगन भुजबळ यांनी येवला शासकीय विश्राम गृह येथे आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर दराडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे,  प्रांताधिकारी सोपान कासार, निफाडच्या प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे, येवल्याचे तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाडचे तहसीलदार दिपक पाटील, मनमाड पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, गटविकास अधिकारी डॉ.उमेश देशमुख, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एच.आर. गायकवाड, लासलगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यवंशी, शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी,  सहायक निबंधक एकनाथ पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहरातील रुग्णसंख्या वाढणार नाही याबाबत दक्षता घेऊन कोमॉर्बीड रुग्णांची नियमित तपासणी करून त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात यावे. रुग्णांच्या तपासणीची संख्या अधिक वाढविण्यात येऊन कोमॉर्बीड रुग्णांची ऑक्सिजनची लेव्हल ची तपासणी नियमित करून लक्ष ठेवण्यात यावे अशा सूचना देत  मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करावा असे आदेश दिले.

ते म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील काळात अधिक दक्षता घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी सेंट्रल ऑक्सिजनसह लागणाऱ्या आवश्यक त्या सोयी सुविधा तयार करण्यात याव्यात असे आदेश दिले. ग्रामीण भागात गर्दी होणाऱ्या ठिकाणी पोलीसांनी विशेष लक्ष देऊन गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी गावनिहाय स्थापन करण्यात आलेल्या दक्षता समित्या कार्यरत करण्यात येऊन गावपातळीवर विशेष लक्ष ठेऊन गर्दी टाळण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सांगितले.

मक्याची खरेदी १०० टक्के करा

यावेळी छगन भुजबळ यांनी पीक कर्ज, कर्जमाफी,मका खरेदी, वीजेचे प्रश्नांचा आढावा घेत उपस्थित शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच मका खरेदीस शासनाने परवानगी दिलेली असून शंभर टक्के खरेदी पूर्ण करावी, शेतकरी कर्ज माफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देऊन त्यांना पीक कर्जाचे वाटप लवकरात करावे यासह सोळा गाव पाणी पुरवठा योजना, तसेच विजेच्या प्रश्नांबाबत आढावा घेऊन तक्रारी निकाली काढण्याचे आदेश दिले.

तालुक्यात २४४ रुग्ण

यावेळी येवला तालुक्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्के आहे. आतापर्यंत तालुक्यात २४४ रुग्ण आढळले असून १८८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्या ४५ रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण १७ रुग्ण दगावले असून मृत्युदर ६.९६ इतका आहे. येवला शहारातील सर्वेक्षाणामध्ये आढळुन आलेल्या १९१६ कोमॉर्बीड रुग्णांना विटामिन सी, विटामिन डी.आणि झींक सपलिमेंटचे वाटप करण्यात आलेले आहे . येवला शहरामध्ये सध्या १३ कंटेनमेंट झोन अस्तित्वात आहेत. त्यामध्ये केलेल्या सर्वेक्षणात १२९ कोमॉर्बीड रुग्ण आढळुन आलेले आहेत. ग्रामीण भागामध्ये ७ कंटेनमेंट झोन अस्तित्वात आहेत . त्यामध्ये केलेल्या सर्वेक्षणात ७९६ कोमॉर्बीड पेंशंट आढळुन आलेले असून तालुक्यात २२ हजाराहून अधिक कोमॉर्बीड रुग्ण असल्याचे प्रांत अधिकारी कासार यांनी सांगितले. तर निफाड तालुक्यातील रुग्णांबाबत व करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबाबत प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे यांनी माहिती दिली.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...