Skip to main content

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अनलॉक ३ मार्गदर्शक तत्वे जारी; शाळा, महाविद्यालयं ३१ ऑगस्टपर्यंत बंदच!.. वाचा काय सुरू होणार..

दिल्ली| केंद्रीय गृह मंत्रालयाने आज अनलॉक ३  ची नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली, त्यामध्ये प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आणखी व्यवहारांना मुभा देण्यात आली आहे,  येत्या 1 ऑगस्ट 2020 पासून अनलॉक ३ अमलात येणार असून टप्याटप्याने व्यवहार पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेची व्याप्ती अधिक व्यापक करण्यात आली आहे.
Unlock-३
फोटो: फाईल
राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांकडून आलेला प्रतिसाद आणि संबंधित केंद्रीय मंत्रालये आणि विभागांशी व्यापक चर्चा केल्यानंतर त्यावर ही नवी मार्गदर्शक तत्वे आधारित आहेत.

नवीन  मार्गदर्शक तत्त्वांची ठळक वैशिष्ठ्ये:-
  • व्यक्तींच्या रात्रीच्या ये- जा करण्यावरचा निर्बंध (नाईट कर्फ्यु) रात्रीची संचारबंदी हटवण्यात आली.
  • योग संस्था आणि जिम्नॅशियम 5 ऑगस्ट 2020 पासून उघडण्यासाठी परवानगी. या संदर्भातशारीरिक अंतर राखण्यासाठी आणि कोविड -19 चा संसर्ग रोखण्यासाठी,आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय मानक संचालन पद्धती जारी करेल.
  • स्वातंत्र्य दिन कार्यक्रमांना शारीरिक अंतर आणि मास्कचा वापर यासह इतर आरोग्य नियमांचे पालन करत परवानगी.या संदर्भात गृह मंत्रालयाने 21-7- 2020 रोजी जारी केलेल्या सूचनांचे पालन आवश्यक.
  • राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांशी व्यापक चर्चा केल्यानंतरशाळामहाविद्यालये आणि शिकवणी देणाऱ्या कोचिंग संस्था 31 ऑगस्ट 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • प्रवाश्यांसाठी आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासाला वंदे भारत अभियानांतर्गत मर्यादित पद्धतीने परवानगी देण्यात आली आहे.
  • प्रतिबंधित क्षेत्राबाहेरखालील बाबी वगळता सर्व बाबींना परवानगी देण्यात आली आहे-
i.  मेट्रो रेल्वे
ii.  सिनेमा हॉलतरण तलावमनोरंजन पार्कथिएटरबारऑडिटोरियाम, सभागृह आणि तत्सम स्थळे
iii.  सामाजिकराजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिकसांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम आणि इतर मोठ्या प्रमाणात लोक एकत्र आणणारे कार्यक्रम
परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार या बाबी खुल्या होण्यासाठीच्या तारखा स्वतंत्रपणे ठरवण्यात येतील.
  • प्रतिबंधित क्षेत्रात 31 ऑगस्ट 2020 पर्यंत लॉक डाऊनची काटेकोर अंमलबजावणी जारी राहील आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेली मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊनकोविड 19 चा प्रसार रोखण्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी प्रतिबंधित क्षेत्राचे काळजीपूर्वक सीमांकन करावे. प्रतिबंधित क्षेत्रात कडक परिघिय नियंत्रण राखणे आवश्यक असून केवळ आवश्यक बाबीनाच परवानगी राहील.
  • ही प्रतिबंधित क्षेत्रे संबंधित जिल्हाधिकारी आणि राज्येकेंद्रशासित प्रदेश यांच्या संकेतस्थळावर अधिसूचित केली जातील आणि ही माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालायलाही दिली जाईल.
  • प्रतिबंधित क्षेत्रातल्या व्यवहारांवर राज्ये आणि केंद्र शासित औथोरिटी कडून काटेकोर देखरेख ठेवली जाईल. प्रतिबंधात्मक उपायांशी संबंधित मार्गदर्शक तत्वांची कठोर अंमलबजावणी केली जाईल.
  • आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय प्रतिबंधात्मक उपायांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवेल.

प्रतिबंधित क्षेत्राबाहेरच्या बाबींसाठी राज्ये निर्णय घेणार
राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश परिस्थितीच्या मूल्यांकनानुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेर काही बाबींचा प्रतिबंध करू शकतातकिंवा आवश्यक काही निर्बंध घालू शकतात. मात्र आंतर राज्य आणि राज्या अंतर्गत व्यक्ती आणि मालाची आवक जावक याना निर्बंध नाही. अशी ये-जा करण्यासाठी वेगळ्या परवानगीचीसंमतीची,ई परवानगीची आवश्यकता नाही.

कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देश
शारीरिक अंतराची खातरजमा करून कोविड-19 व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशांचे पालन देशभरात सुरूच ठेवायचे आहे. दुकानांनीग्राहकांमध्ये पुरेसे शारीरिक अंतर राखण्याची आवश्यकता आहे. गृह मंत्रालय राष्ट्रीय निर्देशाच्या प्रभावी अंमलबजावणीवर देखरेख ठेवेल.

असुरक्षित व्यक्तींचे संरक्षण
असुरक्षित व्यक्तीं उदा. 65 वर्षावरील व्यक्तीइतर  आजार असलेल्या व्यक्ती,गरोदर महिला,10 वर्षाखालील मुलेयांना अत्यावश्यक गरजा आणि आरोग्य विषयक बाबी वगळता घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आरोग्य सेतूचा वापर
आरोग्य सेतू मोबाईल ऐपच्या वापराला प्रोत्साहन सुरूच राहील असे सांगण्यात आले.
सौ. पीआयबी.


Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...