Skip to main content

जनसुविधा योजनेतील निधी वेळेत खर्च करा: झेडपी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर

नाशिक| चालू आर्थिक वर्षातील जनसुविधा योजने अंतर्गत कामांवरील निधी वेळेत खर्च करा अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केल्या आहे.
Zp-president
फोटो: फाईल
नाशिक जिल्हा परिषदेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात जनसुविधा योजने अंतर्गत कामे प्रस्तावित करुन जिल्हा नियोजन मंडळास सादर केलेली होती. ग्रामीण भागातील ग्रामस्तरावरील कामांची निकड, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणात जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. सदर योजनेत मंजूर कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, स्मशानभूमी बांधकाम करणे, दफनभूमी बांधकाम करणे, दशक्रिया विधी शेड बांधकाम करणे व तत्सम अनुषंगिक कामे आदी कामांचा समावेश असून यासाठी रुपये (२६,५७,७६,०००/-) सव्वीस कोटी सत्तावन्न लक्ष शहात्तर हजार रकमेची २५७ जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. 

नाशिक जिल्ह्यात मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भावामुळे ग्रामीण भागात विकास कामांवर मोठा परिणाम झालेला होता. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे मंजुर असलेली विकास कामे सुरु करण्यास विलंब होत होता. कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर कमीत कमी कर्मचारी नाशिक जिल्हा परिषदेत कर्तव्यावर कार्यरत असून सुद्धा नाशिक जिल्हा परिषदेने जनसुविधा योजने अंतर्गत जिल्हा नियोजन मंडळाकडून प्राप्त झालेले (१५,६१,०४०००/-) पंधरा कोटी एकसष्ट लक्ष चार हजार रुपयांचा निधी ग्रामपंचायत स्तरावर २५७ कामांसाठी वितरित केला आहे. सदर निधीची रक्कम ही मंजुर कामांच्या रकमेच्या साधारण ७० टक्के असून निधी कामनिहाय ग्राम पंचायतींना वितरित केला आहे. जनसुविधा योजने अंतर्गत निधी ग्रामपंचायत स्तरावर वितरीत केल्यामुळे ग्राम पंचायत स्तरावर विकास कामांना गती येणार आहे.

मंजूर कामांचा निधी वितरीत: परदेशी

विविध विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा यासाठी ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा करत होते. नाशिक जिल्हा परिषदेने सदरचा निधी वितरणाबाबत तात्काळ नियोजन करुन मंजुर कामांचा निधी ग्रामपंचायत स्तरावर वितरित करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे


जनसुविधा योजने अंतर्गत काम निहाय वितरित केलेल्या निधीतून तात्काळ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात येऊन सदर कामे तात्काळ पुर्ण होतील व निधी वेळेत खर्च होईल या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. निधी अखर्चित राहणार नाही याबाबत गटविकास अधिकारी यांनी दक्षता घ्यावी.

दर्जेदार कामासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावे

ग्रामपंचायत स्तरावर जनसुविधा योजने अंतर्गत निधी वितरित करण्यात आला आहे. सदर निधीतुन मंजुर जनसुविधेची विकास कामे दर्जेदार होतील यासाठी लोकप्रतिनिधी यांनी प्रयत्न करावे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...