Skip to main content

नाशिक जिल्ह्यातील धरणांचे पाणी महाराष्ट्रालाच देणार: ना. भुजबळ

नाशिक| गेल्या काही काळात गोदावरी खोऱ्याचे पाणी गुजरातच्या प्रकल्पांना देण्याचे प्रस्ताव मांडण्यात आला होता. परंतु महाराष्ट्रातील अनेक भाग पाण्यापासून वंचित असल्याने महाराष्ट्रातील काही जिल्ह्याची तहान भागविणे आवश्यक आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे पाणी महाराष्ट्राच्या बाहेर न जावू देता त्याचा फायदा महाराष्ट्राच्याच जमिनीला देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. 
Minister-bhujbal
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित कळमुस्ते प्रवाही वळण योजना, वैतरणा मुकणे वळण योजना उर्ध्व कडवा प्रकल्पांच्या आढावा बैठकित पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी आमदार हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अहमदनगरचे अधिक्षक अभियंता व प्रशासक अरुण नाईक, मध्यवर्ती संकल्प चित्र संघटना, नाशिकचे अधिक्षक अभियंता राजेश मोरे, कार्यकारी अभियंता आर. ए. शिंपी आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, प्रवाही वळण योजना कळमुस्ते ही योजना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कळमुस्ते शिवारातील डोंगरगाव या गावाजवळील दमणगंगा खोऱ्यातील वाल नदीच्या स्थानिक नाल्यावर प्रस्तावित आहे. गोदावरी व तापी खोऱ्यातील उपलब्ध पाण्याचा पुर्णपणे वापर झाला असल्यामुळे शासनाने औरंगा, अंबिका, नारपार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा खोऱ्यातील नद्यांचे पाणी अरबी समुद्रात वाहून जात होते त्यामुळे गोदावरी व तापी खोऱ्यात वळविण्याचा अभ्यास समन्वय समितीमार्फत करण्यात आला. त्यानुसार 19 प्रवाही वळण योजनेद्वारे 2321 द.ल.घ.फु. पाणी नाशिक जिल्ह्यातील गोदावरी खोऱ्यात उपलब्ध होणार आहे. यामध्ये कळमुस्ते ही मोठी वळण योजना असून याद्वारे दमणगंगा खोऱ्यातील 690.16 द.ल.घ.फु./ 19.54 द.ल.घ.फु पाणी गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याचे नियोजन असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले. तसेच त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडीजवळ बांधण्यात येणाऱ्या कळमुस्ते धरणाचे संकल्पचित्र महिन्याभरात पूर्ण करुन शासनाला सादर करण्याची सूचना मध्यवर्ती संकल्प चित्र संघटनेच्या अधिकाऱ्यांना यावेळी श्री. भुजबळ यांनी केली.

वैतरणा धरणाचे 1-टीएमसी पाणी मुळणे धरणात वळविणार

वैतरणा धरण पुर्णपणे भरल्यानंतर सांडव्यावरुन वाहून जाणारे पुराचे पाणी वैतरणा नदीन पडून अरबी समुद्राला जाऊन मिळत असल्याने उर्ध्व वैतरणा-मुकणे धरण प्रवाही वळण योजनेतंर्गत उर्ध्व वैतरणा धरणाच्या सॅडल डॅमद्वारे 1 टीएमसी पाणी मुळणे धरणात वळविण्यात येण्याबाबत या बैठकित चर्चा करण्यात आली.  तसेच वैतरणा धरणासाठी अतिरिक्त संपादित झालेल्या जमिनीबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अमंलबजावणी करण्यात येणार असल्याचे, पालकमंत्री श्री. छगन भुजबळ यांनी सांगितले. 

भूसंपादनाची समस्या जमीन मालकांशी चर्चा करुन सोडविणार

इगतपुरी तालुक्यातील घोरपडेवाडी गावाजवळ उर्ध्व कडवा बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पाअतंर्गत 860 मी. लांबीचे व 21.80 मी. उंचीचे मातीचे धरण प्रस्तावित आहे. सद्यस्थितीत धरणाच्या बुडीत क्षेत्राचे सर्वेक्षण व सिमांकन, भांडारगृह, चौकीदार निवासस्थान, धरणाकडे जाणारा रस्ता आदी.कामे पूर्ण झाली असून बुडीत क्षेत्र व धरण पायाच्या बाधित शेतकऱ्यांचा भूसंपादनास विरोध आहे. त्यामुळे उर्ध्व कडवा प्रकल्पाच्या भूसंपादनाची समस्या जमीन मालकांशी चर्चा करुन सोडविण्याच्या सूचना यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे. 
सौ. जिमाका


Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...