Skip to main content

आरोग्य विद्यापीठात पदवी महाविद्यालय आणि पदव्युत्तर संस्था सुरू करण्यासाठी अहवाल तयार करा: ना.अमित देशमुख

मुबई| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने विद्यापीठ परिसरात नवीन वैद्यकीय पदवी महाविद्यालय व वैद्यकीय पदव्युत्तर संस्था तसेच आयुर्वेद, होमिओपॅथी आणि भौतिकोपचार पदवी महाविद्यालय सुरू करण्याबाबतचा परिपूर्ण अहवाल तयार करून विभागास सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांना आज दिले.
Prepare-report-for-starting-degree-college-post-graduate-institute-in-health-university-minister-Amit-Deshmukh
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कामकाजासंदर्भातील आढावा बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर,  कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, टाटा मेमोरियल सेंटरचे डॉ. कैलास शर्मा, रिलायन्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. गुस्ताद डावर यांच्यासह विद्यापीठाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत विद्यापीठ कामकाजाचे सादरीकरण, तसेच विद्यापीठाचे प्रस्तावित पदवी व पदव्युत्तर वैद्यकीय,आयुर्वेदिक, होमियोपॅथी महाविद्यालयांना स्थापनेच्या अनुषंगाने आढावा आणि सादरीकरण तसेच विद्यापीठाने कोविड -19 च्या अनुषंगाने विद्यापीठाने केलेली कामे याबाबत आढावा घेण्यात आला.

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठासाठी आकृतिबंध मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विद्यापीठाच्या निधीतून शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी यांची पदे तयार करू शकते का, विद्यापीठाचे प्रादेशिक केंद्र चालविण्यासाठी राज्य शासनाने जमीन देणे,विद्यापीठ डॉक्टरांच्या लोकसंख्येच्या अनुषंगाने अनुज्ञेय ब्रुहत आराखडा तयार करण्यात यावा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फिजिओथेरपी, नर्सिंग, व्यावसायिक थेरपी महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश देण्याबरोबरच राज्य शासन वैद्यकीय, आयुर्वेद,होमिओपॅथी महाविद्यालयाचे आरोग्य विज्ञान शिक्षण केंद्राचे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संकुल कसे होईल, कुत्रिम बुद्धिमत्ता निर्माण कशी करता येईल याबाबत अहवाल तयार करावा असे निर्देश दिले.

राज्यस्तरीय  मान्यताप्राप्त महाविद्यालयासाठी रेटिंग दिले जाऊ शकते का,  विद्यार्थी व शिक्षकांना ऑनलाईन सेवा सुविधा कशा देता येतील, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा विमा कसा काढता येईल, शारीरिक अपंग विद्यार्थ्यांना काय वेगळया सेवा देता येतील, विद्यापीठ संशोधनावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी काय करता येईल याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विद्यापीठाचे कुलगुरू यांना अहवाल करण्यास सांगितले.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...