Skip to main content

तुम्ही प्रयत्न करा, नोकरी आम्ही मिळून देऊ: प्रेरणा बलकवडे यांचे आवाहन! मेळाव्याला ६०० युवक युवतींचा प्रतिसाद

नाशिक| वेळ कठीण आहे पण युवक-युवतींनी गोंधळून न जाता नोकरीसाठी सतत प्रयत्नशील रहावे आम्ही ही तुम्हाला नोकरी मिळून देण्यास कटिबध्द आहोत असे आवाहन  राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि झेप भरारी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी आज येथे केले आहे. 
You-try-we-will-get-the-job-together-Prerna-Balkwades-appeal-Response-of-600-young-men-and-women-to-the-meet

नोकरी मेळाव्याप्रसंगी बेरोजगार युवक युवतींना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.भगूर शहरात युवक युवतींसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आणि झेप फाऊंडेशनच्या वतीने(Job Fair2020) नोकरी मेळाव्याचे करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी सुमारे ६०० हून अधीक युवक युवतींनी सहभाग नोंदवला. 

करोनाच्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊनमुळे परप्रांतीय कामगारांचे इतर राज्यात स्थलांतर झाले आहे. त्यामुळे उद्योगीक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची कमतरता भासत आहे. या पार्श्वभुमीवर पुणे,मुंबई, नाशिक, नागपूर येथील नामांकीत अस्थापना कंपन्यांमध्ये विविध प्रकारच्या रिक्तपदांसाठी मोठी संधी देऊ केली आहे. 

तरुणांसाठी आज घडीला नोकरी मिळवणे हे खुप कठीण काम वाटते. ‌ योग्य माहितीची कमतरता, अधिक माहिती, नेमका इंटरेस्ट कशात याविषयी माहिती नसणे, करिअरविषयीचे अनेक समज-गैरसमज आणि करिअरविषयी मनात असलेला गोंधळ नेमका का, या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्नात ते गोंधळून जातात..पण या सर्व गोष्टींना वाचा देत, तुम्ही प्रयत्न करा नोकरी आम्ही मिळवून देऊ असे आश्वासन राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष  प्रेरणा बलकवडे यांनी तरुणांना दिले तसेच या पुढेदेखील रोजगारासाठी काऊंसीलींग सेंटर भगूर मध्ये सुरु राहील अशी महिती त्यांनी बोलताना दिली. 

तत्व टेकनाॅलोजीस(ठाणे), आरयन हाॅस्पीटॅलिटी, पाटले एड्यू स्कील्स फाऊंडेशन( नागपूर), ॲक्युरा वाॅलव्ह, भंडारी ग्लोबल सरव्हीसेस, अजमेरा इंडस्ट्रीज, एमपी असोसीएट्स, स्वराली काॅन्ट्रेक्ट्स या कंपनींसह काही कंपन्यांचे virtual मुलाखाती देखील या ठिकाणी घेण्यात आल्याची माहिती झेप फाऊंडेशनचे सेक्रटरी विशाल बलकवडे यांनी दिली. आज जागेवर ४० लोकांची नेमणुक करण्यात आली असून पुढील दोन दिवसात नेमणुकीचा दुसरा टप्पा पार पडणार आहे व त्यात देखील असंख्य तरुणांना नोकरीची संधी मिळेल अशी माहिती त्यांनी दिली. आर्यन हॉस्पीटॅलिटीचे रसल मॅथीव व पाटले एड्यू स्कील्सचे रंजीत पांडे यांनी तरुणांना ऑडियो कॉन्फरन्स द्वारे मार्गदर्शन केले. 

या वेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, विशाल बलकवडे, आमोल हरळे, गोरखनाथ बलकवडे, चिंतन अजमेरा, गणेश गायधनी, पंकज शेलार, सतीश भंडारी, दर्शन अनारे, सचीन गुळवे, सुरज वंदार, आदिंसह असंख्य युवक युवती उपस्थित होते.



Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...