- नेहमी स्वता:शी स्पर्धा करा, मोठे ध्येय ठेवा: विशेष पो. महानिरीक्षक प्रताप दिघावकर - TheAnchor

Breaking

October 26, 2020

नेहमी स्वता:शी स्पर्धा करा, मोठे ध्येय ठेवा: विशेष पो. महानिरीक्षक प्रताप दिघावकर

नाशिक| नेहमी स्वता:शी स्पर्धा करा, मोठे ध्येय ठेवा, शिवाजी महाराजांसारखेच चारित्र्य ठेवा. त्यांनी स्वराज्याचे जे स्वप्न पाहिले त्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच परिश्रम जर विद्यार्थिनीने घेतले तर नक्कीच त्यांचे ध्येयपुर्ण होईल. असे सांगून विद्यार्थिनीना गुणवंत व्हा, यशवंत व्हा! अशा शुभेच्छा ही मुख्य अतिथी नाशिकचे विशेष पोलिस  महानिरीक्षक  श्री. प्रताप दिघावकर  यांनी  दिले. तसेच आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थिनीना मार्गदर्शन करुन.  विजया दशमीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भोसला मिल्ट्री स्कूल गर्ल्सची नेहमी प्रगती होवो अशी मंगल कामना केली.

Celebration-of-Vijaya-Dashami-in-the-premises-of-Bhosla-Military-School-Girls


विजया दशमीचा कार्यक्रम मुख्य अतिथी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्यासह  मोजक्या पदाधिकारी व शिक्षकवृंदाच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मुख्य अतिथी नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक  प्रताप दिघावकर व मान्यवर अतिथींच्या हस्ते विद्यालयाचे संस्थापक डॉ.  बा. शी. मूंजे यांच्या प्रतिमेस  पुष्पहार अर्पण करण्यात आले.  प्रारंभी विद्यालयातील सर्व अश्वांचे पुजन करण्यात आले. 


विद्यालयातील चार कंपन्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चार ध्वजाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच वीर सावरकर रचित शस्त्र स्तोत्र म्हणुन शस्त्र पुजन करण्यात आले. मुख्य अतिथीचा परिचय विद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अंजली सक्सेना यांनी केला .तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सेंट्रल हिंदू मिलिटरी एजुकेशन सोसायटीचे पालक श्री. मिलिंद वैद्य यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला. तसेच  विद्यालयाकडुन  एक स्मृतिचिन्ह भेटस्वरुप देण्यात आले देण्यात आले.



ब्रिगेडियर एम. एम. मसूर विशिष्ट सेवा मेडल ( नि) यांनी आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी संस्थेचे पालक श्री. मिलिंद वैद्य, कोशाध्यक्ष श्री. शीतल देशपांडे , श्री. अतुल बेदकर,  संस्थेच्या पदाधिकारी श्रीमती प्रणीता गुजराथी, श्री प्रदिप पेशकर, श्री राहुल कट्टी, ब्रीगेडियर एम. एम. मसूर विशिष्ट सेवा मेडल, प्राचार्या श्रीमती डॉ. अंजली सक्सेना शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्र संचालन श्रीमती प्रज्ञा डोंगरदीवे व श्रीमती स्मिता जोशी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता  राष्ट्रगीताने करण्यात आली.