- पुणे पदवीधर मतदार नोंदणीतील त्रुटी दूर करा; भाजपा प्रदेशाध्यक्ष यांची निवडणूक आयोगाकडे मागणी - TheAnchor

Breaking

October 22, 2020

पुणे पदवीधर मतदार नोंदणीतील त्रुटी दूर करा; भाजपा प्रदेशाध्यक्ष यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

पुणे| पुणे विधानपरिषद पदवीधर मतदार संघातील मतदारांची यादी तयार करण्याच्या ऑनलाईन प्रक्रियेतील त्रुटी दूर करा, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. या संदर्भात पाटील यांनी गुरुवारी मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
Eliminate-errors-in-Pune-graduate-voter-registration-BJP-state-president-Chandrakantdada-Patils-demand-to-the-Election-Commission

या निवेदनात मा.पाटील यांनी म्हटले आहे की, पदवीधर मतदारसंघाच्या मतदार ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत अनेक त्रुटी आहेत. या त्रुटी दूर न करताच  निवडणूक घेण्याची तयारी सुरू आहे. याबाबीकडे राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष यापूर्वीच वेधण्यात आले होते.ऑनलाईन भरलेले अर्ज नाकारले जाणे अशा अनेक तक्रारी मतदारांनी केल्या आहेत.त्याबरोबर सर्व्हर यंत्रणा काम करत नसल्यानेही या प्रक्रियेत अनेक अडचणी येत असल्याने ऑफलाईन अर्ज भरण्याची परवानगी देण्यात यावी. अशी मागणी ही करण्यात आली. याप्रसंगी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपा प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती पाटील उपस्थित होते.