Skip to main content

खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ‘सरसेनापती हंबीरराव’च्या टीमला दिल्या सदिच्छा

पुणे|प्रतिनिधी| लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांच्या आगामी बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ या  भव्य ऐतिहासिक चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे निर्माते निर्माते संदीप मोहिते पाटील, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम यांनी नुकतीच छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या प्रसंगी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची पूर्णाकृती मूर्ति उर्विता प्रॉडक्शन्सच्या वतीने भेट देण्यात आली.
MP-Chhatrapati-Udayan-Raje-Bhosale-gave-his-best-wishes-to-the-team-of-Sarsenapati-Hambirrao
या भेटीबद्दल आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर खासदार उदयनराजे भोसले यांनी माहिती दिली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित तयार होत असलेल्या "सरसेनापती हंबीरराव" या बिग बजेट चित्रपटाचे निर्माते संदीप मोहित पाटील, धर्मेंद्र बोरा, सौजन्य निकम यांच्यासह रणजीत ढगे पाटील, डॉ. रणजीत निकम यांनी भेट घेऊन चित्रपटाबद्दलची संपूर्ण माहिती दिली. स्वराज्याचा इतिहास मोठ्या पडद्यावर येत असताना आजच्या पिढीला स्वराज्याच्या शिलेदारांची महती समजत आहे याचा मनस्वी आनंद होत आहे. सरसेनापती हंबीरराव चित्रपट टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.’’

राजेंच्या प्रोत्साहनामुळे संपूर्ण चित्रपटाच्या टीमला बळ मिळाले:निर्माते संदीप पाटील

याविषयी बोलताना चित्रपटाचे निर्माते संदीप मोहिते पाटील म्हणाले की, उदयनराजे भोसले यांनी  ‘सरसेनापती हंबीरराव’ हा आपला चित्रपट आहे, त्यामुळे त्याचे प्रमोशन अगदी हक्काने मीच करणार हे आवर्जुन सांगितल्याने आमच्या संपूर्ण टीमला  खऱ्या अर्थाने दहा हत्तींचं बळ मिळालं आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...