Skip to main content

पीएम किसान योजनेतील लाभार्थ्यांना पाठवलेल्या नोटीसा परत घ्या; अन्यथा आंदोलन छेडू: पुरुषोत्तम कडलग

नाशिक |प्रतिनिधी| नाशिक जिल्ह्यातील ११००० शेतकऱ्यांना पीएम  किसान योजनेतून प्राप्त झालेला लाभ वसुली व अपात्रतेच्या नोटीस देण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांना कुठला ही लाभ देतांना अनेक कागद पत्रांची मागणी होऊन त्यात त्यांच्या पात्रतेची शहानिशा केली जाते. त्यांनतर त्या योजनांचा लाभ दिला जातो. लाभ द्यायचा आणि परत घ्यायचा असा प्रकार निंदनीय आहे. शेतकऱ्यांना पाठवलेल्या वसुलीच्या नोटिसा मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी दिला. 
Withdraw-notices-sent-to-PM-Kisan-Yojana-beneficiaries-Otherwise-start-the-movement-Purushottam-Kadlag

पीएम  किसान योजने अंतर्गत प्राप्त होणारा वार्षिक तीन हप्त्यात मिळणारा ६०००/- रूपयांचा लाभ या योजनेचा खुप गाजावाजा करण्यात आला होता. त्यात शेतकरी ७/१२ च्या आधारे लाभार्थी झाले होते.  अशा लाभार्थ्यांना अपात्र ठरवत तहसीलदारांमार्फत नोटिसा देण्यात आल्या आहेत. एकीकडे पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकरी त्यासंकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असतांना अशा प्रकारच्या नोटीसा पाठवून शेतकऱ्यांची केंद्र सरकार थट्टा करत आहे असा आरोप कडलग यांनी केला. परस्पर खात्यावर पैसेही जमा होण्यास गेल्या दोन वर्षापासुन सुरूवात झाली होती. त्यात अनेक शेतकरी जे अल्पभूधारक आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यास सुरूवात केली होती. परंतु कालपासून शेतकऱ्यांना पी एम योजनेतील लाभार्थ्यांना अपात्र ठरवले आहे. केंद्र सरकार अनेक फसव्या घोषणा करून जनेतेची थट्टा करत असल्याचाच हा प्रकार आहे असे ते म्हणाले.

प्रत्येक तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा: पुरुषोत्तम कडलग


जिल्ह्यातील ११००० शेतकर्याना पाठविलेल्या ह्या नोटींसा परत घेण्यात याव्यात अन्यथा जिल्ह्यातील प्रत्येक तहसिलदार कार्यालयावर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नाशिक जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस त्या वतीने जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना देण्यात आल्याची माहीती जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यांनी दिली.

पुरुषोत्तम कडलग, जिल्हाधक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नाशिक

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...