Skip to main content

जिल्हा बँकेकडे पीककर्ज अनुदान १२२ कोटी, वाटले केवळ ४६ कोटी! ना. भुसे यांची नाराजी

मालेगाव| जिल्हा बँकेला शेतकऱ्यांचे १२२ कोटीचे कर्जमाफीचे अनुदान वितरीत करण्यात आल्यानंतर केवळ ८ हजार ९२० शेतकऱ्यांना ४६ कोटी ४५ लाखाचे पिक कर्ज जिल्हा बँकेने वितरीत केले आहे. ही अत्यंत खेदाची बाब असून जिल्हा बँकेबाबत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी नाराजी व्यक्त करत पिक कर्जापोटी किमान 100 कोटीची रक्कम वाटप करण्याचे निर्देश देऊन पीक कर्जाची प्रकरणे तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पिंगळे यांना दिले.  
District-Bank-has-peak-loan-grant-of-Rs-122-crore-Distribution-only-Rs-46-crore-minister-dada-Bhuses-displeasure
शासकीय विश्रामगृहात आयोजित सर्व बँक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा, जिल्हा उपनिबंधक सतिष खरे, महानगरपालीकेचे उपायुक्त नितीन कापडणीस, उप विभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एस.एन.पिंगळे, मालेगावचे विभागीय अधिकारी एम.टी.डंबाळे, पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, रामा देवरे, शशी निकम, मनोहर बच्छाव यांच्यासह सर्व राष्ट्रीयकृत बँकेचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.  

मालेगाव तालुक्यातील १३ हजार ८५८ शेतकऱ्यांचे १२२ कोटीचे कर्जमाफीचे अनुदान जिल्हा बँकेला वितरीत करण्यात आल्यानंतर केवळ ८ हजार ९२० शेतकऱ्यांना ४६ कोटी ४५ लाखाचे पिक कर्ज जिल्हा बँकेने वितरीत केले आहे. ही अत्यंत खेदाची बाब असून जिल्हा बँकेबाबत कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी नाराजी व्यक्त करत पिक कर्जापोटी किमान १०० कोटीची रक्कम वाटप करण्याचे निर्देश जिल्हा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक श्री.पिंगळे यांना दिले. पुढे बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, प्रधानमंत्री हे सर्व नागरिकांना बँकींग क्षेत्रात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहीत करित असतांना नवीन बँक खाते उघडण्याबाबत बँकांची उदासिनता दिसून येते. शेतकऱ्यांची फरपट, विनावाटप पडून असणारे शासकीय अनुदान, महिला शेतकऱ्यांसह बचत गटांना असहकार्य याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. ही निश्चितच असमाधानकारक बाब असून ती खपवून घेणार नसल्याचेही मंत्री ना. भुसे यावेळी म्हणाले.

पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची एकाच वेळी पूर्तता करावी, त्यांना वारंवार बँकेत फेऱ्या मारण्याची वेळ येता कामा नये. दाखल प्रकरणांवर तात्काळ संस्करण करून प्रकरणे मार्गी लावा. प्रधानमंत्री आत्मनिर्भय योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांची दाखल प्रकरणे विहीत मुदतीत मंजूर करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले.  कर्जमाफीसाठी तांत्रीक अडचणीमुळे जे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले असतील, अशा शेतकऱ्यांची तपशिलवार माहिती सर्व बँकांनी सादर करण्याचे आवाहन मंत्री श्री.भुसे यांनी केले. तर अशा शेतकऱ्यांचा शासन स्तरावर पाठपुरावा करून लाभ मिळवून देणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. तसेच महिला बचत गटांना पतपुरवठा न केल्याने ते खाजगी पतपुरवठा करणाऱ्या कंपन्याकडे वळत आहेत. ही अत्यंत खेदाची बाब असून महिला शेतकऱ्यांसह महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी सर्व बँकांनी प्राधान्याने महिला बचत गटांना पतपुरवठा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 

सर्व बँकांमध्ये समन्वय आवश्यक : प्रातांधिकारी विजयानंद 

शर्मा शासकीय योजनांचे अनुदान वितरणाचे काम हे बँकेमार्फत होत असते. या लाभापासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही यासाठी बँक खाते आधार लिंक करणे, के.वाय.सी. ची पुर्तता करणे, शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवून बँकिंग व्यवहार व योजनांची माहिती देण्यासाठी स्वतंत्र सन्मान कक्षाची स्थापना करण्याची संकल्पना मांडतांना प्राताधिकारी विजयानंद शर्मा यांनी सर्व बँकांनी आपसात समन्वय ठेवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचे आवाहन यावेळी केले. 

बँकांमधील विनावाटप पडून असलेल्या शासकीय अनुदानासाठी खर्चताळमेळ आवश्यक : सतिष खरे 

शासनाकडून कर्जमाफी, नुकसान भरपाई, संजय गांधी निराधार योजनेस विविध प्रकारचे अनुदाने हे बँकेमार्फत वितरीत होतात. यात सुमारे ४२ हजार ३७४ लाभार्थ्यांचे जवळपास २३.२४ कोटी रकमेचे अनुदान तांत्रीक बाबीमुळे विनावाटप पडून आहे. यासाठी सर्व बँकेच्या शाखा व्यवस्थापकांसह संबंधित यंत्रणेने खर्चताळमेळ घेवून वंचित लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सतिष खरे यांनी यावेळी केले. तर जिल्हा बँकेबाबत कृषी मंत्र्यांनी व्यक्त केलेली नाराजी ही त्यांच्या कार्यपूर्तीतून दुर होईल अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...