Skip to main content

सीआरपीएफचे असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव अनंतात विलीन

नाशिक| भारतीय निमलष्कराच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात कार्यरत असलेले असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांचे छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना शहीद झाले. असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांच्यावर सायंकाळी नाशिक शहरातील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.


अंत्यसंस्कारस्थळी अन्न व नागरी पुरवठा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार सीमा हिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिरीक्षक संजय लाटकर, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, छत्तीसगड सेक्टर उपमहानिरीक्षक राज कुमार, पुणे सेक्टर उपमहानिरीक्षक बी.के.टोपो,  पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचेसह नागरिक उपस्थित होते.

अंत्यसंस्कार स्थळी पार्थिव येताच राज्य शासनाच्या वतीने अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, निमलष्करी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वतीने महानिरीक्षक संजय लाटकर, नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस आयुक्त दीपक पांडेय, नाशिक पोलीस परिक्षेत्राच्या वतीने परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी सूरज मांढरे, ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यानंतर केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या तुकडीने बंदुकीच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून असिस्टंट कमांडन्ट नितीन भालेराव यांना अखेरची मानवंदना दिली.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी शहीद नितीन भालेराव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास छत्तीसगड येथील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ताडमेटला परिसरातल्या बुरकाल येथून ६ किलोमीटर अंतरावर स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २०६ कोब्रा बटालियनचे सहायक कमांडन्ट नितीन भालेराव यांना वीरमरण आले होते.

नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवपूर या गावचे मूळ असलेले शहीद नितीन भालेराव हे नाशिक शहरातील राजीवनगर येथे वास्तव्याला होते. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या गोखले एज्युकेशन येथे पूर्ण करून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून केंद्रीय राखीव दलात दाखल झाले होते. २०१० साली केंद्रीय राखीव पोलीस दलात भरती झालेले जवान नितीन भालेराव यांनी सर्वप्रथम जम्मू काश्मीर येथील कुलगाम येथे सेवा बजावली होती त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाच्या विशेष संरक्षण टीम मध्ये त्यांनी सेवा दिली होती. त्यानंतर राजस्थानमधील माउंटअबू स्थित ‘अंतर्गत सुरक्षा अकादमी‘ येथे त्यांनी काम केले होते. जून महिन्यापासून ते २०६ कोब्रा बटालियन मध्ये सहाय्यक कमांडन्ट म्हणून कार्यरत होते.

दरम्यान, नक्षलवादी विरोधी कारवाया रोखण्यासाठी त्यांचे विशेष योगदान होतं. देशांतर्गत झालेल्या विविध लढाऊ स्पर्धेत शहीद नितीन भालेराव यांनी उत्तम कामगिरी केली होती. शहीद नितीन भालेराव यांच्या पश्चात आई भारती, पत्नी रश्मी, मुलगी अन्वी, तर दोन भाऊ अमोल व सुयोग असा परिवार आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...