राजस्थान| प्रहार संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज राजस्थान भरतपूर येथील गुरूद्वारात रक्तदान केले. रक्तदाना नंतर आज परत दिल्ली करीता प्रवास सुरू झाला. तत्पूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू यांना मध्यप्रदेशमध्ये जोरदार पाठींबा मिळाल्याचे दिसले.
"किसानों के सन्मान में बच्चू कडू मैदान" चलो दिल्ली अशी हाक देत बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना पाठींबा देत मोटार सायकल रॅली काढली आहे.यात कार्यकर्ते ही मोठया संख्येने सहभागी झाले, दिल्लीतील आंदोलन स्थळी जात असतांना त्यांना मध्यप्रदेश येथे मोठा पाठींबा मिळला. आज राजस्थान भरतपूर येथील गुरुद्वारा येथे थांबून त्यांनी कार्यकर्त्यांसह रक्तदान केले. त्यानंतर पुन्हा दिल्लीकडे .राज्यमंत्री बच्चू कडू रवाना झाले.