- देवळाली कॅन्टोन्मेंट रुग्णालयाला रक्षामंत्री पुरस्कार - TheAnchor

Breaking

December 17, 2020

देवळाली कॅन्टोन्मेंट रुग्णालयाला रक्षामंत्री पुरस्कार

दीपक कणसे
भगुर| कोविड-१९ काळात देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डापैकी देवळाली खडकी व पुणे येथील कॅन्टोमेंट या रुग्णालयांनी करोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यासाठी जे अथक परिश्रम घेतले, त्याची फलश्रुती म्हणून सार्वजनिक आरोग्य कोविडसाठी आव्हान या श्रेणीतील रक्षामंत्री पुरस्कार प्रधान करतांना आपणास मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन रक्षा संपदा नवी दिल्लीच्या महासंचालिका दीपा बाजवा यांनी केले.
Defense-Minister-Award- to-Deolali-Cantonment- Hospital-covid-19-corona

रक्षा संपदा विभागाच्या महानिदेशक कार्यालयासह देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड व प्रादेशिक कार्यालययांसोबत आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले यावेळी सहसंचालिका सोनम यंदोल यांच्यासह सर्व अतिरिक्त संचालक व सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. तर देवळाली कॅन्टोनमेंट बोर्ड कार्यालयामध्ये हे या पुरस्काराचा स्वीकार करण्यासाठी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जे एस गोराया नगरसेवक बाबुराव मोजाड, भगवान कटारिया, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार,  सहमुख्य कार्यकारी अधिकारी संजय सोनवणे, निवासी वैद्यकीय अधिक्षिका जयश्री नटेश, आरोग्य अधिक्षक रजिंदर सिंह ठाकुर, डॉ. मोनिका गोडसे, देवी लखमियानी, शीला आहेर आदींनी या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला.

यावेळी ब्रिगेडियर गोराया यांनी रक्षा संपदा दिनाच्या शुभेच्छा देतांना कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलच्या डॉक्टर्स  व सर्व स्टाफसह आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी हा पुरस्कार केवळ सर्व डॉक्टर नर्सेस व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीच्या जोरावर मिळाला असल्याचे सांगताना देवळाली सह देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांना पंधराव्या वित्त आयोगामधून निधी वितरीत होणार असल्याचे सांगितले.

यामुळे देवळालीच्या विकासाला चालना मिळणार आहे. कोविड उपचारासाठी खासदार हेमंत गोडसे आमदार सरोज अहिरे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळोवेळी निधी उपलब्ध झाल्याबद्दल त्यांचेही ऋणनिर्देश व्यक्त केले. दरम्यान मे महिन्यापासून ते आजतागायत देवळाली कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये ५९२३ नागरिकांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली असून यामध्ये १५३० नागरिक कोविड पॉझिटिव्ह आढळून आले होते. यापैकी १२३३ रुग्णांवर कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले तर ८१८ नागरिकांना घरीच विलगीकरण करत उपचारासाठी सहाय्य करण्यात आले दरम्यान शहरात ६१५० नागरिकांची स्क्रिनिंग करण्यात आली तर  १४२२ नागरिकांचे रॅपिड टेस्ट अंतर्गत चाचणी करण्यात आली होती यामध्ये २५७ नागरिक पॉझिटिव्ह आढळले तर शहरात केवळ ३  नागरिकांचा मृत्यू या दरम्यान झाला या सर्व उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हा पुरस्कार मिळाल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींसह आरोग्य विभागाचे कर्मचारी व सर्व मेडिकल स्टाफचे प्रशासनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे