नाशिक| सद्धम्म हॉलिडेतर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनांनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारीत ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. दि. १ ते ६ डिसेंबर प्रश्नमंजुषेत महाराष्ट्रातून २ हजार स्पर्धक सहभागी झाले. काल श्रावस्ती घनश्याम आहिरे, श्रवंती घनश्याम आहिरे या चिमुकल्यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून यातील विजेत्या स्पर्धकांची नावे जाहीर झाली. यातील प्रथम विजेता रोहन जाधव यास विनामूल्य बुद्धगया जाण्याची सुवर्णसंधी लाभली आहे.
तर द्वितीय पुरस्कार केशव गायकवाड यांना मिळाला आहे. व्दितीय क्रमांकाच्या विजेत्याला सहलीमध्ये ५० टक्के सूट दिली जाणार आहे. तृतीय पुरस्कार प्राजक्ता रोकडे यांना मिळाले आहे. सद्धम हॉलिडेतर्फे देश - विदेशात सहलींचे आयोजन करण्यात येते. आमच्या ट्रॅव्हल संस्थेद्वारे सहलीला यायचे असेल तर लवकरात लवकर हवी ती सहल बुक करा आणि वेगळ्या पर्यटन स्थळांना भेटी द्या!
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन व सर्व सभासदांनी सहभाग दिल्याबद्दल आभारी आहे. तसेच प्रत्येक महिन्यात २० प्रश्नांवली दिली जात आहे जात असून त्यात आपण सर्वांनी सहभाग व्हावे असे आवाहन सद्धम हॉलिडेचे संचालक अभिजित भोसले आणि सम्राट सोनवणे यांनी केले आहे.
या ऑनलाइन धम्म परीक्षेमध्ये लकी ड्रॉ काढण्यात आले, त्यातील विजेत्यांची नावे खालील प्रमाणे
प्रथम विजेता
रोहन सतीश जाधव
(रत्नागिरी) १०,०००₹ ची बुद्ध गया धम्म यात्रा पूर्ण पणे मोफत.
द्वितीय विजेता
केशव तुकाराम गायकवाड
(उस्मानाबाद) १०,०००₹ ची बुद्ध गया धम्म यात्रे मध्ये ५०% सूट.
तृतीय विजेता
प्राजक्ता प्रमोद रोकडे.
(नाशिक) १०,०००₹ ची बुद्ध गया धम्म यात्रे मध्ये २५% सूट.
उतेजनार्थ १ व २ (१०,०००₹ ची बुद्ध गया धम्म यात्रे मध्ये १०% सूट.)
१ दीक्षा महादेव पाखरे. (जालना)
२ शिवाजी शंकर पवार. (देवळा)