मुंबई| मागील महिन्यापासून भारताने निर्यातबंदी मागे घेतली. यामुळे बांगलादेशात लाल कांद्याची आयात सुरू झाली. परंतु तेथील शेतकऱ्यांचे नुकसान होवु नये, यासाठी बांगलादेशाने कांद्यावर दहा टक्के आयातकर लावला. यामुळे शेतकऱ्यांना कांद्याच्या सौद्यात तोटा सहन करावा लागत आहे असा आरोप जलसंपदा आणि शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. बच्चू कडू यांनी केला आहे.
![]() |
Photo: File |
एकीकडे शेतकरी हिताचे तिन कायदे आहेत, शेतीमालास भाव मिळेल असे सांगणारे आयात धोरणावर का गप्प बसलेले आहे? बांगलादेशला जे जमले ते भारताला का नाही? यामुळे सरकार कोणासाठी काम करते हे स्पष्ट लक्षात येत आहे. असे ही सांगितले. फेसबुक या सोशल माध्यमातून त्यांनी आपली भूमिका मांडली आहे.