Skip to main content

आरोग्य विद्यापीठाने संशोधन केंद्र बनवून जागतिक ठसा उमटावावा: राज्यपाल कोश्यारी

नाशिक|आरोग्य क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन कार्य करुन नाशिक हे तीर्थक्षेत्रासमवेत आरोग्य विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र बनवून त्याचा जागतिक ठसा उमटवावा असे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी येथे केले.  आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ऑनलाईन विसाव्या दीक्षान्त समारंभाप्रसंगी केले. ते या समारंभास ऑनलाईन उपस्थित होते.
या समारंभास मा. कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखा अधिकारी नरहरी कळसकर, विद्यापीठ विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या दीक्षांत समारंभातील अध्यक्षीय भाषणात मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले की, कोविड-19 आजाराच्या परिस्थितीत आरोग्य शिक्षणातील सर्व विद्याशाखांनी एकत्र येऊन आरोग्य विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय काम केले याबद्दल मला अभिमान आहे.आरोग्य आणि शिक्षण या मुलभूत गोष्टींने समाजाचा विकास होतो. या गोष्टी दर्जेदार होण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशिल रहावे. कोविड-19 च्या परिस्थितीत आरोग्य विद्यापीठाने विविध विद्याशाखांच्या परीक्षा यशीस्वीरित्या घेतल्या याबद्दल विद्यापीठाचे त्यांनी कौतुक केले.  आरोग्य क्षेत्रात जास्तीत जास्त संशोधन कार्य करुन नाशिक हे तीर्थक्षेत्रासमवेत आरोग्य विद्यापीठ हे संशोधनाचे केंद्र बनवून त्याचा जागतिक ठसा उमटवावा असेही त्यांनी सांगितले.
University-of-Health-Sciences-online-convocation-ceremony
ते पुढे म्हणाले की, आयुर्वेद आणि योग शास्त्र मानवी आरोग्यासाठी व उचरासाठी महत्वपूर्ण आहे, यासाठी या शास्त्रांतील संशोधनात अधिक महत्वपूर्ण कार्य करावे असे त्यांनी सांगितले. प्रशासकीय कामकाज व परीक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात करावा जेणेकरुन पेपरलेस कामकाज करता येईल आणि पर्यावरणाचेही रक्षण होईल असे त्यांनी सांगितले.  
दीक्षांत समारंभात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी विद्यापीठाचा अहवाल सादर करतांना सांगितले की, कोविड - 19 विषाणू आजारासंदर्भात जनजागृतीकरिता विद्यापीठातर्फे संलग्नित महाविद्यालयांच्या वतीने  व्हीडीओ द्वारे जनजागृती, मास्क वाटप, आरोग्य सेतु अॅप डाउनलोड करण्यासाठी जनजागृती करणे, रोगप्रतिकारक औषधांचे वाटप व इतर उपक्रम राबविले.  अवयदान करण्यासाठी विविध उपक्रम विद्यापीठाकडून घेण्यात आले यामध्ये निबंधस्पर्धा व पोस्टर पेंटींग करणे आदी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला. यावर्षाच्या राजपथावरील पथसंचालनात विद्यापीठाच्या संलग्नीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता हे गौरवास्पद आहे.  विद्यार्थी विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यापीठ प्राधिकरणांचे सदस्य तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने कोविड सुरक्षा योजना लागू केली आहे. कोविड-19 या महामारीच्या कालावधीत विद्यार्थ्यांचा ताण कमी व्हावा यासाठी आंतरवासिता प्रशिक्षण प्रमाणपत्राचे महाविद्यालयीन स्तरावर विकेंद्रीकरण, ऑनलाईन प्रक्रिया यासारखे विद्यार्थींकेंद्रित निर्णय विद्यापीठार्फे घेण्यात आले आहेत. 
ते पुढे म्हणाले की, विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी निगडीत असलेले प्रलंबित अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. जे काही प्रश्न प्रलंबित आहेत ते लवकरच मार्गी लागतील यासाठी विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार श्री. अमित देशमुख यांचे मार्गदर्शन व सहकार्य महत्वपूर्ण आहे. विद्यापीठ आवारात लवकरच वैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरपी अभ्यासक्रमाची विद्यापीठाची महाविद्यालये सुरु करण्यासाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. याबाबत शासनाकडे कार्यवाही सुरु असून काम अंतीम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले. 

विद्यापीठाचा विसाव्या ऑनलाईन दीक्षांत समारंभाचे विद्यापीठाच्या अधिसभागृहात सकाळी 11.00 वाजता प्रारंभ झाला. या समारंभात विविध विद्याशाखांच्या पदवीका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या व आंतरवासियता पूर्ण केलेल्या आरोग्य शाखांच्या 8064 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या आहेत. विविध विद्याशाखांमधील गुणवत्ता प्राप्त केलेल्यांना 85 सुवर्णपदक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने सुवर्णपदक व संशोधन पूर्ण केलेल्या 03 विद्यार्थ्यांना पीएच.डी. प्रदान करण्यात आली. 

शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील उत्तीर्ण पात्र विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभात पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये आधुनिक वैद्यक विद्याशाखा पदवीचे 517, दंत विद्याशाखा पदवीचे 1926, आयुर्वेद विद्याशाखेचे 726, युनानी 
विद्याशाखेचे 80, होमिओपॅथी विद्याशाखेचे 943, पीबी बी.एस्सी. नर्सिंग विद्याशाखेचे 509, बी.पी.टी.एच. विद्याशाखेचे 134, बी.ओ.टी.एच. विद्याशाखेचे 13, बी.ए. एस.एल.पी. विद्याशाखेचे 34, बी.पी.ओ. विद्याशाखेचे 03, डिप्लोमा इन ऑप्टोमेट्री विद्याशाखेचे 03, पदव्युत्तर विद्याशाखेमध्ये एम.डी.मेडिकल विद्याशाखेचे 1051, एम.एस.मेडिकल विद्याशाखेचे 673,  डी.एम.मेडिकल विद्याशाखेचे 249, एम.सी.एच. मेडिकल विद्याशाखेचे 67, पी.जी.डिप्लोमा विद्याशाखेचे 262 आदी विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पदवी प्रदान करण्यात आली आहे. या कार्यक्रमात मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी पदवीदान करणेबाबत मान्यवरांना विनंती व आभार मानले.   

या कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले.या दीक्षांत समारंभाचेhttps://t.jio/MUHS2021 वरुन थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपणास मोठया प्रमाणात विद्यार्थी, शिक्षक, पालक व अभ्यागत उपस्थित होते.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...