Skip to main content

उत्राणे गावाच्या सर्वांगीण विकासावर भर देणार: ॲड.रविंद्र पगार

नामपूर|प्रतिनिधी| उत्राणे गावाचा सर्वांगीण विकास करुन गावच्या जनतेने टाकलेला विश्वास सार्थ करा असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी केले आहे.
Utrane-will-focus-on-overall-development-of-the-village-Adv-Ravindra-Pagar
बागलाण तालुक्यातील उत्राणे ग्रामपंचायतीची निवडणुक नुकतीच पार पडली. यात नामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिपक पगार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलच्या सर्वच्या सर्व ८ जागा मोठ्या मताधिक्याने निवडुन आल्या आहेत. या नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांचा सपत्नीक सत्कार गावचे भूमिपुत्र व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार व त्यांच्या पत्नी सौ.संध्या पगार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पॅनल प्रमुख दिपक पगार, नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य केदा पगार, कोमल पगार, रोहिदास आहिरे, आकाश पगार यांची भाषणे झाली.
निवडणुकीतील उणीदुणी काढत बसण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन उत्राणे गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील रहावे असे देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यावेळी बोलतांना सांगितले.

राज्य सरकारच्या माध्यमातून असलेल्या  विविध योजना उत्राणे गावात राबविण्यासाठी उपमुख्यमंत्री ना.अजित पवार, पालकमंत्री ना.छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून आपण सर्वत्तोपरी सहकार्य करु असेही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

यावेळी नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्य श्री. केदा पगार, पुंजाराम पगार, सौ.योगिता पगार, सौ.हर्षदा पगार, श्रीमती अनुसया पगार, सौ.झेलाबाई बागुल, कोमल पगार, श्री.रोहिदास आहिरे आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सर्वश्री दादाजी पगार, लोटन पगार, सीताराम पगार, डोंगर पगार, बळीराम पगार, दिलीप पगार, मोठाभाऊ पगार, कारभारी पगार, डॅा.मोहन पगार, संजय पगार, संतोष पगार, प्रवीण पगार, जगदीश पगार, गणेश पगार, अशोक पगार, उत्तम भामरे, शेनाजी पगार, युवराज पगार, कारभारी बागुल, चंद्रकांत निकम, दिनकर पगार, शरद पगार, विनोद पगार, भाऊसाहेब पगार, रावसाहेब पगार, नितीन पगार, साहेबराव पगार ,लोटन पगार, दादाजी पगार ,सीताराम पगार, संतोष पगार, प्रवीण पगार, दिलीप पगार, दिनकर पगार, नितीन पगार, अनिल पगार, भाऊसाहेब पगार, प्रशांत पगार, उत्तम भामरे, रावसाहेब पगार, युवराज पगार, गणेश पगार, विरेंद्र पगार, शुभम पगार, दर्शन पगार, कविता पगार, लीलाबाई पगार, संध्या पगार, शकुंतला पगार, अंजली पगार, निकिता पगार, मनीषा अहिरे, कावेरी पगार आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी: उत्राणे ग्रामपंचायतीची निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचीत ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करतांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार. समवेत पॅनल प्रमुख दिपक पगार, ग्रामपंचायत सदस्य केदा पगार, पुंजाराम पगार, योगिता पगार, हर्षदा पगार, कोमल पगार, अनुसया पगार, रोहिदास अहिरे, झेलाबाई बागुल, आकाश पगार आदि दिसत आहेत.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...