Skip to main content

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा रास्ता रोको

नाशिक| विंचूर|  पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसचे दर कमी करण्यासाठी केंद्रातील भाजप सरकारने तातडीने हस्तक्षेप करून इंधनाचे भाव कमी करावेत व सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केली आहे.
NCPs-district-president-Adv-ravindra-pagar-led-by-Road-block
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने नाशिक - औरंगाबाद राज्य महामार्गावरील विंचूर चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याप्रसंगी अॅड. रविंद्र पगार बोलत होते. यावेळी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, पुरुषोत्तम कडलग, राजेंद्र डोखळे, हरिश्चंद्र भवर, बबन शिंदे आदींची भाषणे झाले.

पेट्रोल, डिझेलची मोठया  प्रमाणात दरवाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला असून केंद्रातील मोदी सरकारला सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांशी कुठलेही देणेघेणे नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकी पूर्वी घरगुती गॅसचे भाव वाढल्यावर टीव्हीवर येऊन गृहिणीचे बजेट कोलमडल्याचे ओरडून सांगणाऱ्या त्या काकू आता गॅसचे दर ७२५ रुपये इतके झाले तरी त्या अजून टिव्हीवर दिसत नाहीत. त्या काकू कुठे गेल्या ते शोधावे लागेल असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी म्हटले आहे.

कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर थोडेफार वाढले की, बहुत हुई मेहंगाई कि मार... अशी घोषणा देणारे नेते आता पेट्रोलचे भाव ९५ रुपये तर डिझेलचे भाव ८४ रुपये प्रति लिटर झाले तरी शांत का असा सवाल देखील अॅड. पगार यांनी यावेळी बोलतांना केला. 

एकही भुल कमल का फुल; पेट्रोल डिझेलची दरवाढ मागे घ्या. यासोबतच पेट्रोल डिझेलचे भाव कमी झालेच पाहिजेत यासोबतच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करून आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
 
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ राज्य महामार्गावरील विंचूर चौफुली येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना  पगार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर, भाऊसाहेब भवर, बबनराव शिंदे, निफाड तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, दिंडोरी तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्या नुतन आहेर, ज्ञानेश्वर शेवाळे, योगेश पाटील, ना‌. छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, पांडुरंग राऊत, राहुल सालगुडे, प्रफुल पवार, भुषण शिंदे, राजेंद्र बारगुडे,  सचिन दरेकर, संतोष राजोळे, अनिल सोनवणे, ललित दरेकर, आत्माराम दरेकर, स्माईल मोमीन, मंगेश गवळी, अर्षद शेख, सोहेल मोमीन, महेश मेथे, शिवाजी सुपनार, दत्ता रायते, रंजीत गुंजाळ, दत्ता डुकरे, मोसिन शेख, जयंत साळी, विलास गोरे, अविनाश सालगुडे, सुनिल आहेर, दत्ता वाघचौरे, शाम हिरे, ललित निकम, किरण भोसले, मोसिन शेख, अविनाश सालगुडे, मधुकर गावडे, नानासाहेब जेऊघाले, रामकृष्ण दराडे, बाळासाहेब पुंड, अशोक नागरे, संतोष राजोळे, जयंत साळी. अनिल विंचूरकर, अशोक गोसावी, विलास गोरे, सचिन वाघ, महेंद्र पुंड, तौसिफ मनियार आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
 
 

फोटो ओळी - पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ राज्य महामार्गावरील विंचूर चौफुली येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलन प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार समवेत पुरुषोत्तम कडलग, जयदत्त होळकर, भाउसाहेब भवर, राजेंद्र डोखळे, साहेबराव मढवई, बबनराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे, ज्ञानेश्वर शेवाळे, सोहेल मोमिव आदी दिसत आहेत.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...