Skip to main content

..अखेर सायखेड़ा गोदापात्रातील पानवेली काढण्यास सुरुवात; खंडू बोडके यांचे टाळे लावा आंदोलन स्थगित

संतोष गिरी
निफाड| तालुक्यातील गोदाकाठच्या गोदापात्रात दोन महिन्यांपासून अडकलेल्या पानवेली काढण्यास टाळाटाळ करणाऱ्या पाटबंधारे विभागाने महाराष्ट्र राज्य बियाने उपसमितीचे सदस्य, करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांच्या शिवसेना स्टाईल "टाळे लावा" आंदोलनाचा धसका घेत आज सोमवारी (दि.२९) पाट बंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने बोटिंच्या सहाय्याने पानवेली काढण्यास प्रारंभ केला. त्यामुळे खंडू बोडके-पाटील यांनी उद्या मंगळवार (दि.३०) पासून जाहीर केलेले कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला "टाळे लावा" आंदोलन स्थगित केले आहे. 
After-the-removal-of-Panveli-from-Saykheda-Godapatra-Khandu-Bodkes-Lock-Movement-suspended
गोदापात्रातील पानवेलीमुळे साथीचे आजार फैलावल्याने गोदाकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. पानवेली काढण्याची वारंवार मागणी करूनही पाटबंधारे त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे आपल्या आक्रमक आंदोलनासाठी प्रसिद्ध असलेल्या खंडू बोडके-पाटील यांनी थेट कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्या कार्यालयाला ३० तारखेला टाळे ठोकून सायखेडा पुलावर जनआंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्यामुळे धास्तावलेल्या अधिकाऱ्यांनी खंडू बोडके-पाटील यांना आंदोलन न करण्याची विनंती केली होती. मात्र खंडू बोडके-पाटील आंदोलनाच्या पवित्र्यावर ठाम असल्याने अखेर आज सोमवारी अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने पानवेली काढण्यास प्रारंभ केला. त्यापुर्वी खंडू बोडके-पाटील यांनी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता निकम, सायखेडचे शाखा अभियंता खैरनार, नांदूरमध्यमेश्वरचे शाखा अभियंता शरद नागरे यांच्यासह शरद कुटे, करंजगावचे सरपंच नंदू निरभवणे यांच्यासमवेत पानवेलींची पाहणी करून चर्चा केली. 
यावेळी उपअभियंता निकम यांनी पानवेली काढण्यासाठी दोन पथके करणार असून सायखेड़ा, करंजगाव पुलावर अडकलेल्या पानवेली महीनाभरात बोटी व मनुष्यबळच्या सहाय्याने काढण्यात येतील असे सांगितले. तसेच सदर पानवेली नाशिक महानगरपालिका क्षेत्रातुन येत असल्याचे सांगितले. मात्र दरवर्षी गोदावरीला पानवेलीचा विळखा बसत असल्याने त्यावर निधीची तरदूत करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश खंडू बोडके-पाटील यांनी यावेळी दिले. कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याशीही खंडू बोडके-पाटील यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. पानवेली पाहणीवेळी सायखेडचे माजी उपसरपंच शरद कुटे, करंजगावचे सरपंच नंदू निरभवणे, करंजगाव शिवसेना गणप्रमुख सागर जाधव, माजी ग्रामपालिका सदस्य योगेश बोराडे, रमेश पाटील राजोळे, योगेश राजोळे आदि उपस्थित होते.


पानवेली काढण्यासाठी कायम स्वरुपी तरतूद असावी: बोडके

दरवर्षी पानवेलीमुळे गोदाकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. त्यावर देखभाल दुरुस्ती अतंर्गत निधीची तरतूद करून कायमस्वरूपी उपाययोजना पाटबंधारे विभागाने करावी. पाटबंधारे विभागाच्या मनमानीला चाप बसविण्यासाठी गोदाकाठच्या शेतकऱ्यांच्या उचल पाणी परवानगीसाठी यापुढे आपण लढा देणार आहोत.

श्री.खंडू बोडके-पाटील
माजी सरपंच करंजगाव
सदस्य : महाराष्ट्र राज्य बियाणे,
उपसमिति, मंत्रालय मुंबई.


(फ़ोटो)
१) पाटबंधारे विभागाचे उपअभियंता निकम, खैरनार यांच्याशी पानवेलींसंदर्भात चर्चा करताना खंडू बोडके-पाटील, शरद कुटे व शिष्टमंडळ

२) सायखेड़ा येथे बोटिंच्या सहाय्याने पानवेली काढण्यास केलेला प्रारंभ

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...