Skip to main content

बोकडदरे १००% कृषी वीज बिल भरणारे महाराष्ट्रातील अव्वल गाव

संतोष गिरी
निफाड| तालुक्यातील पुर्व भागातील व येवला- लासलगाव या विधानसभा मतदार संघातील बोकडदरे येथे विंद्युत वितरण कंपनीने ग्रामसभा घेऊन कृषी विज धोरण २०२० ही योजना व गावाचा फायदा या बाबी समजावून सांगितल्या. तसेच बोकडदरे येथे विज बिल भरण्यासाठी चक्क स्पर्धा होऊन १८०  विज ग्राहकांनी बावीस लाख रुपये भरना करुन १००% विज बिल भरणा केल्याने हे गाव महाराष्ट्रात अव्वल ठरले आहे, अशी माहिती विद्युत वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता विजयानंद काळे यांनी दिली. ते नैताळे येथे झालेल्या कार्यक्रमात बोलत होते.    
Bokdadare-is-the-top-village-in-Maharashtra-paying-100%-agricultural-electricity-bill
महाराष्ट्रात सर्वत्र विज बिल भरणा करण्यासाठी विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी प्रयत्न करत आहेत, याचाच एक भाग म्हणून निफाड या उपविभागातील बोकडदरे येथे विद्युत वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता बंकट सुरवसे व सहाय्यक अभियंता पुजा वाळुंज यांनी बोकडदरे ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेस उपस्थित राहुन कृषी विज धोरण २०२० ही योजना सांगून गावासाठी योजना किती फायद्यची आहे हे समजावून सांगितले होते.

बोकडदरे ग्रामस्थानी योजना समजून घेतल्याने विज बिल भरणा करण्यासाठी चक्क स्पर्धा झाली व अतिशय कमी कालखंडात १००% विज बिल भरणा झाला यातुन विद्युत वितरण कंपनीला २२ लाख रुपयांचा महसुल मिळाला त्यामुळे विद्युत वितरण कंपनीच्या अधिक्षक अभियंता विजयानंद काळे यांनी या परिसराला भेट दिली.नैताळे ता.निफाड येथे कोविड- १९ चे नियम पाळून एका शानदार कार्यक्रमाचे आयोजन करुन  बोकडदरे येथील शेतकऱ्यांचा सन्मान केला. १००% विज बिल भरणा करुन या गावाने महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला आहे. यावेळी ,नाशिक शहर मंडळ अधिक्षक अभियंता प्रविण दरोली, कार्यकारी अभियंता रविंद्र आव्हाड, सहाय्यक अभियंता कैलास शिवदे निफाड उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता बंकट सुरवसे, सहाय्यक अभियंता कु. पुजा वाळुंज, जनमित्र अतुल गजबे यांचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचलन भाऊराव दराडे यांनी केले कार्यक्रमास परिसरातील शेतकरी विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी वर्ग उपस्थित होते.         

बोकडदरे गावाने सर्वांसमोर आदर्श ठेवला: सुरवसे

बोकडदरे या गावाने कृषी पंपाचे १००% विज बिल भरुन परिसरात आदर्श निर्माण केला आहे इतर गावानी ही कृषी धोरण २०२० या योजनेत भाग घेऊन आपला व परिसराचा लौकिक वाढवावा  
                            
बंकटजी  सुरवसे               
उप कार्यकारी अभियंता 



Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...