Skip to main content

बाधितांची संख्या कमी न झाल्यास लॉकडाऊन अटळ

नाशिक| कोरोनाकाळात सर्वांनी माणुसकीच्या भावनेतून व सामुहिक जबाबदारीने काम करावे. तसेच प्रशासनाने जारी केलेल्या निर्बंधांचे नागरिकांकडून काटेकोरपणे पालन होत नसल्याने कोरोनाबधितांची संख्या  अशीच वाढत राहिल्यास येत्या काही दिवसात लॉकडाऊन अटळ आहे, असे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
If-the-number-of-victims-does-not-decrease-lockdown-is-inevitable
येवला शासकीय विश्रामगृह येथे येवला व निफाड तालुक्याच्या झालेल्या कोरोना सद्यस्थिती व उपाययोजना आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलात होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, येवला प्रांतधिकारी सोपान कासार, निफाड प्रांताधिकारी अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, शरद घोरपडे, येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक प्रशांत खैरे, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, तालुका वैद्यकीय अधिकारी शरद पाटील, गट विकास अधिकारी उन्मेष देशमुख, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, गृहवीलगीकरणात असणाऱ्या रूग्णांचा शोध घेऊन त्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. ज्या गृहवीलगीकरणातील रूग्णांची घरात नियमांनुसार व्यवस्था नसेल अशा रुग्णांना तत्काळ कोविड केअर सेंटरमध्ये स्थलांतरीत करण्यात यावे. जेणेकरून त्या रुग्णांच्या माध्यमातून संसर्ग पसरु नये यासाठी प्रशासनाने नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत. 
खाजगी डॉक्टरांकडून कोरोनाबधित रूग्णांवर उपचार करण्यात येत असतील तर त्याची देखील नियमित माहिती प्रशासनास देण्याबाबत खाजगी डॉक्टरांना कळविण्यात यावे. तसेच ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या जास्त आहे तेथे प्रतिबांधित क्षेत्र जाहीर करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर पोलिसांच्या मदतीने कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.
व्यवसायिकांनी व्यवसाय करतांना गर्दी वाढणार नाही याचे भान ठेवून लागू करण्यात आलेल्या नियमांची अंमलबजावणी करावी. गर्दीच्या नियोजन व नियंत्रणासाठी प्रशासनाने पोलिसांचे सहकार्याने कार्यवाही करण्यात यावी.पोलिसांनी लग्नसोहळ्याना परवानगी देताना तेथे नियमांचे पालन होते आहे हे पाहण्यासाठी लग्नसोहळ्याच्या ठिकाणी एक-दोन पोलिसांची नेमणूक करावी.निर्देश पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिले.

येवला व निफाड या दोन्ही तालुक्यात लसीकरण वाढविण्यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. जेणे करून लसीकरणाची मोहीम राबविताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि सर्वांचे वेळेत लसीकरण पूर्ण होईल, असे पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी बैठकीत प्रशासकीय व आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.येवला व निफाड प्रांताधिकारी यांनी तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनाची माहिती पालकमंत्री यांना दिली.

तालुक्यातील ज्या गावांचा पाण्याच्या टँकरसाठी प्रस्ताव प्राप्त झाले असतील त्यावर तातडीने काम करून पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना टंचाईचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...