Skip to main content

लासलगावला कांदा लिलाव सलग ५ दिवस बंद; कोट्यवधीची उलाढाल ठप्प

संतोष गिरी 
लासलगाव| सणासुदीचा काळ आणि लागून आलेल्या सुट्यांमुळे आशिया खंडातील अग्रेसर लासलगाव बाजार समितीत कांदा लिलाव ५ तर धान्य लिलाव ७ दिवस बंद आहे. त्यामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार असून सणासुदीला दोन पैसे गाठीशी बांधता येतील या आशेवर असलेले शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाले आहे. दि. १ एप्रिल पासून कांदा लिलाव पूर्ववत होणार आहे.
Lasalgaon-onion-auction-closed-for-5-days-in-a-row-Billions-turned-out
बाजार समिती शनिवारी, रविवार दिनांक २७ व २८ मार्च बंद, तर        सोमवार दिनांक २९ मार्च धुलीवंदन आणि मंगळवार  दि.३० आणि ३१ रोजी मार्च वर्ष अखेर लिलाव बंद राहणार असून गुरुवार दिनांक १ एप्रिल पासून कांदा लिलाव पूर्ववत सुरू होतील. तसेच शुक्रवार दिनांक २ एप्रिल रंगपंचमी निमित्त समिती बंद असेल, तसेच सोमवार दिनांक २९ मार्च  २०२१ पासून शनिवार दिनांक ३ एप्रिल २०२१ पर्यंत धान्य लिलाव बंद राहतील. सोमवार दिनांक ५ एप्रिल २०२१ पासून धान्य लिलाव पूर्ववत सुरू होतील असे सूत्रांनी सांगितले आहे. शेवटचा महिना मार्चमधील अखेरचे दिवस, होळी, धुलिवंदन असे सण आणि साप्ताहिक सुट्ट्या आहेत. 

कोरोनाचा कांदा उत्पादकांना फटका

मार्च महिन्यातील अखेरचे दिवस असूनही लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याची आवक अद्यापही मोठ्या प्रमाणात होत आहे. नवीन उन्हाळ कांद्याची आवक दाखल झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. कांद्याचे बाजारभाव एक हजार रुपयांच्या आत आले असून सर्वसाधारण ८०० ते ९०० रुपये कांद्याला बाजार भाव मिळत आहे.

तोट्यात विक्री

कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा तोट्यात विक्री करत आहे. कोरोनाचं संकट त्यात पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सात दिवस मार्च एंडिंग, सण आणि साप्ताहिक सुट्ट्या निमित्त बँकेतून पैसे मिळणार नसल्याने लासलगाव बाजार समितीसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा व धान्यचे लिलावाचे कामकाज बंद राहणार आहे. यामुळे लासलगाव बाजार समिती आवारात शुकशुकाट दिसत आहे. सलग ७ दिवस बाजार समिती बंद राहिल्यानं कोट्यवधींची उलाढाल ठप्प होणार असल्यानं कांदा उत्पादकांच्या अडचणीत वाढ होणार.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...