Skip to main content

निफाडच्या द्राक्ष उत्पादकांवर कारवाई होणार म्हटल्यावर मा.आ. कदमांचा थेट मातोश्रीवर संपर्क...नेमका काय आहे प्रकार वाचा!

संतोष गिरी
निफाड| मुंबईत शिवाजी पार्क येथे निफाडच्या शेतकऱ्यांनी द्राक्ष स्टॉल लावला होता, पण मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी स्टॉल लावण्यास मज्जाव केला. स्थानिक बाजारात भाव नाही, मुंबईत विक्रीसाठी आलेली द्राक्ष विकू दिली जात नाही अशा द्विधा मनस्थिती असलेल्या शेतकऱ्यांनी थेट माजी आ. अनिल कदम यांच्याकडे कैफियत मांडली, मग काय कदम यांनी थेट मातोश्रीवर संपर्क करत या घटनेची कल्पना दिली. लागलीच शिवसैनिकांनी याठिकाणी धाव घेत कारवाई टाळली आणि द्राक्ष विक्रीसाठीची व्यवस्था करुन दिली कदम यांच्या पुढाकाराने त्यामुळे निफाडच्या द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला.
Mumbai-Municipal-Corporations-action-against-Niphads-grape-growers-was-averted-by-the-initiative-of-Kadam
महाराष्ट्रातील निफाड तालुका हा देशातील कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो तसेच द्राक्षपंढरी म्हणूनही  ओळखला जातो. मात्र गेल्या तीन चार वर्षापासून नैसर्गिक आपत्ती व कोरोनामुळे द्राक्ष उत्पादक अक्षरशः देशोधडीला लागले आहे. सुजलाम  सुफलाम् समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या ज़िद्दीने कमावलेली निर्यातक्षम द्राक्षे कवडीमोल भावाने शेतकरी विकत आहेत. मात्र पिकेल ते विकेल या राज्याचे कृषीमंत्री दादाजी भूसे यांच्या संकल्पनेतील विक्री व्यवस्था नाशिकच्या द्राक्ष मंडळाने प्रत्यक्षात उतरवत निफाडची द्राक्ष मुंबईत विक्री करण्यासाठी पाठबळ दिले.
त्याअनुषंगाने खेरवाडीचे प्रगतिशील द्राक्ष उत्पादक बाबाजी संगमनेरे व ग्रामपंचायत सदस्य कैलास संगमनेरे यांनी आपली द्राक्षे बुधवारी मुंबईत शिवाजी पार्क परिसरात विक्रीचा स्टॉल लावला होता, मात्र कोरोनाचे कारण देत महापालिकेच्या काही कर्मचाऱ्यांनी त्यांना द्राक्ष विक्रीस मज्जाव केला. याची तक्रार बाबाजी संगमनेरे यांनी निफाडचे शिवसेनेचे माजी आ. अनिल कदम यांच्याकडे केली,त्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. योगायोगाने मुंबईला मंत्रालयात असलेले माजी आ. अनिल कदम यांनी तातडीने शिवसेना भवनात संपर्क साधून शिवसेनेच्या पदाधिकारयांना शिवाजी पार्क येथे घटनास्थळी पाठवले. शिवसेना पदाधिकारी यांच्या दणक्यानंतर त्या शेतकऱ्यांना द्राक्ष विक्रीचा तात्पुरता परवाना मिळवून देत द्राक्ष विक्री स्टॉल पूर्ववत केला.
त्यामुळे चांगल्या दराने निफाडची द्राक्ष विकली जाऊन खेरवाडीच्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून कोरोनाच्या या महामारीत अनिल कदम यांनी केलेल्या मदतीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.  या घटनेची  निफाड तालुक्यातील सोशल मीडियात चांगली चर्चा रंगली होती. माजी आमदार अनिल कदम यांनी केलेल्या सहकार्याबद्दल खेरवाडीचे द्राक्ष उत्पादक शेतकरी व द्राक्ष विद्यमान मंडळ यांनी आभार मानले आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...