नाशिक|दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांनी सटाणा देवळा मंगरूळ (चांदवड) एनएच 752जी च्या मंजूरीसाठी भेट घेतली. तसेच चालू वर्षाच्या 2020-21 या योजनेत या प्रकल्पाला मंजुरी देण्याची खा.डॉ.भारती पवार यांनी विनंती केली आहे.
सदर प्रकल्पाची लांबी 37 कि.मी. असून त्याची किंमत रु.330 कोटी असल्याचे कळते. हा प्रस्ताव नुकताच मंत्रालयात सादर करण्यात आला आहे. तरी लवकरात लवकर या प्रकल्पास मंजुरी देण्याची आग्रही विनंती मागणी यावेळी खा.डॉ.भारती पवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचेकडे दिल्ली येथे केली आहे.