Skip to main content

जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नऊ रुग्णवाहिका सेवेत दाखल

नाशिक| जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी नऊ रुग्णवाहिका महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत नाशिक जिल्ह्यातील नव्याने मंजूर झालेल्या व रुग्णवाहिका नसलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी पुरविण्यात आल्या आहेत. 
Admission-of-nine-ambulances-for-primary-health-centers-in-the-district

नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य लहवित, सय्यदपिंप्री, अंजनेरी, पळसन, करंजाळी, चिंचओहळ, दळवट व उंबरगव्हान या आरोग्य संस्थांना १०२ क्रमांकाच्या फोर्स कंपनीच्या बी टाइप रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेसाठी प्राप्त रुग्ण वाहिकांचा लोकार्पण सोहळा कोरोना नियम पाळून प्रातिनिधिक स्वरूपात नाशिक जिल्हा परिषद आवारात नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार श्री. बाळासाहेब क्षिरसागर  व नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे शुभहस्ते वाहन चालकांचे हाती रुग्णवाहिकांच्या चाव्या व रुग्णवाहिकेचे नोंदणी प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री.यशवंत ढिकले, माजी बांधकाम सभापती विलास बच्छाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे उपस्थित होते.

ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांना प्राप्त रुग्ण वाहिकांद्वारे चांगली आरोग्य सेवा मिळेल व रुग्णांना जीवदान देणारी आपली सेवा राहील अशी अपेक्षा वाहन चालक यांना उद्देशून उपस्थित वाहन चालकांकडून अपेक्षा व्यक्त केली. नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी अत्यावश्यक सेवा उपलब्ध होण्यासाठी रुग्णवाहिका मिळणेबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून जिल्हा परिषदेनेपाठपुरावा केला होता.

सध्याच्या कोरोना साथरोग काळात महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी रुग्णवाहिका मंजूर करून दिल्याबद्दल नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री.उध्दव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री नामदार श्री. राजेश टोपे साहेब, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब, कृषिमंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...