Skip to main content

मनपातील कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आणि थकीत वेतन, विमासरंक्षण तात्काळ द्या: अंबादास खैरे

नाशिक| नाशिक मनपा रुग्णालयात नेमण्यात आलेल्या कंत्राटी  वार्ड बॉय, मल्टी स्किल हेल्थ वर्कर, आया, ए.एन.एम, स्टाफ नर्स, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आयुष अधिकारी आदींचे थकीत वेतन तात्काळ देण्यात येऊन या कर्मचाऱ्यांचे विमासंरक्षण देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
Immediate-payment-of-arrears-of-salary-of-contract-health-workers-Ambadas-Khaire


आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक मनपा आयुक्त यांच्या दि.२६ फेब्रुवारी २०२१ च्या आदेशान्वये  कोविड सदृश्य परिस्थित नियंत्रण होणेसाठी रोजी वार्ड बॉय, मल्टी स्किल हेल्थ वर्कर,आया,ए.एन.एम,स्टाफ नर्स, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, आयुष अधिकारी या पदाची तात्पुरत्या स्वरुपात व तात्काळची नोकर भरती करण्यात आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य बघता सर्व कर्मचारी वर्ग विविध आस्थपना येथे कर्तव्यावर हजर झाली. सदर कर्मचारी यांना वेळीच वेतन हा मूलभूत अधिकार आहे. तसेच कोविड अनुषंगाने त्यांना सुरक्षा दृष्टीने उपयोगी वस्तूंचे वाटप वेळच्या वेळी होणे अपेक्षित आहे. आपला जिव धोक्यात टाकून सर्व कर्मचारी काम करत असताना त्यांना विमा व इतर आरोग्य सुविधा देखील मिळणे अपेक्षित असतांना गेल्या 3 महिन्यापासून कुठल्याही प्रकरचा मोबदला दिला गेला नसल्याचे म्हटले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या या सर्व आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचे थकीत वेतन, विमा संरक्षण व इतर सुविधा तातडीने देण्यात याव्यात अन्यथा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टीच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अंबादास खैरे यांनी दिला आहे. यावेळी सागर बेदरकर, रवी रकटे, आकाश कासार, अतुल उदावंत, सुमित धाईजे आदी उपस्थित होते.

Popular posts from this blog

कलावंतांनो मदतीसाठी आम्हाला संपर्क करा; नाशिक चित्रपट महामंडळाचे आवाहन

नाशिक। प्रतिनिधी:  ज्या गरजू कलावंताना मदतीची गरज आहे त्यांनी अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन  करण्यात आले आहे, नाशिक शाखेचे पदाधिकारी रवी जन्नावार , श्याम लोंढे आणि मिंलीद तारा यांच्याशी वैयक्तिक संर्पक करावा त्यासाठी कुठल्याही क्षेत्रातले कलाकार असोत, त्यांची  नावे  सामुहीक किंवा वैयक्तिकरित्या जाहीर होणार नाही याची काळजी शाखा घेणार असल्याचे कळवले आहे. फोटो क्रेडिट: रवी जन्नावार भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या पुण्यनगरीतील त्यांचा वसा समर्थपणे आपल्या खांद्यावर वाहणारे अनेक कलाकार आहे, नाशिकमध्ये अशा कलाकारांची मोठी संख्या आहे, या नाशिकने आतापर्यंत असंख्य कलाकार सिनेसृष्टीला दिली आहे, सध्या covid-19 महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे.  सर्व जण या संकटाशी दोन हात करत आहे.  अशा काळात अनेक कलावंतांची परिस्थिती विस्कळीत झाली आहे. आजपर्यंत असंख्य आपदा आल्या, अखिल भारतीय  मराठी चित्रपट महामंडळ नाशिक शाखा नेहमी मदतीला धावली आहे.  गेल्या दोन महिन्यांपासून बऱ्याच कलाकारांना असंख्य अडचणी येत...

'एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल

 ' एम्स'चे महत्वपूर्ण पाऊल तंत्रज्ञान क्रांतीमुळे मोबाईल आला आणि आता तो आपल्या आयुष्याचा एक भाग झाला. त्यामुळे मोबाईल, इंटरनेटचा वाढता वापर व्यसनात कधी परिवर्तीत झाला हे कळले नाही. आता हा जागतिक चिंतेचा विषय झाला आहे. दैनंदिन जीवनात मोबाईल व इंटरनेट वापराचे जेवढे फायदे आहेत, तसेच त्याचे तोटे ही आहेत. जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहेत. भारतात ही संख्या लक्षणीय आहे, आणि त्यात लहान - मोठ्यांचा ही समावेश आहे. मात्र मुलांवर त्याचा अत्याधिक परिणाम दिसत आहे. मुले अभ्यास करत नाही. तासनतास मोबाईल बघतात, गेम खेळतात अशा पालकांच्या तक्रारी आहेत. यामुळे बाल मानसशास्त्रज्ञ आणि संशोधकांना मुलांमध्ये एकलकोंडेपणा, लहान मुलांमध्ये उशीरा बोलणे आणि किशोरवयीन मुलांमध्ये चिडचिडेपणा, आक्रमकता, लठ्ठपणा, अवसाद, चिंता यासारख्या गंभीर समस्या बघायला मिळत आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच मोबाईल, इंटरनेट तंत्रज्ञानाच्या अति वापर आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या गंभीर मानसिक समस्या लक्षात घेऊन संबंधित व्यसनाधीन वर्तवणुकीवर प्रगत संशोधन केंद्र Centre for Advanced Researc...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...