Skip to main content

पदव्युत्तर वैद्यकीय परीक्षा येत्या 16 ऑगस्टपासून होणार: अमित देशमुख

मुंबई| पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची कोविड परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा दि.16 ऑगस्ट 2021 पासून घेण्याचे निर्देश विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. अमित देशमुख यांनी दिले. 
Post+Graduate-Medical-Examination-will-be-held-from-16th-August-Amit-Deshmukh

उन्हाळी सत्र 2021 मधील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा संदर्भात विद्यापीठाचे प्रती कुलपती तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मा. ना. श्री. अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीस मा. प्रभारी कुलगुरु डॉ.नितीन करमळकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे मा.सचिव श्री. सौरव विजय, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे मा. संचालक डॉ. तात्याराव लहाने, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांचे मा. अधिष्ठाता डॉ. सचिन मुंबरे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल, डॉ. राजश्री नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठाचे प्रति-कुलपती मा. ना. श्री. अमित देशमुख यांनी सांगितले की, विद्यापीठाची उन्हाळी सत्र 2021 पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा दि. 24 जून 2021 पासून नियोजित करण्यात आली होती. कोविड-19 ची परिस्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा काही कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली होती. यामुळे परीक्षेच्या तयारीकरीता विद्यार्थ्यांना 45 दिवसांचा कालावधी मिळेल. 

ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कोविड-19 आजारासंबंधी शासनाने निर्देशित केलेल्या सर्व सुरक्षिततेचे नियम पाळुन घेण्यात याव्यात. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी ई-पास म्हणुन विद्यार्थ्यांना विद्यापीठातर्फे प्रवेशपत्र वितरीत केले जाणार आहे, त्यालाच ई-पास ऐवजी मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ज्या विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षा दिली आहे, परंतू लेखी परीक्षा दिल्यानंतर व प्रात्यक्षिक परीक्षेआधी ज्या विद्यार्थ्यांचा कोविड-19 अहवाल सकारात्मक आला आहे, अशा विद्यार्थ्यांची विलगीकरण कालावधीनंतर स्वतंत्रपणे त्याच प्रात्यक्षिक परीक्षा केंद्रावर परीक्षा घेण्यात येतील. तसेच जे विद्यार्थी लेखी परीक्षेआधी कोविड-19 अहवाल सकारात्मक आल्यामुळे लेखी परीक्षेस बसु शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांची पुर्नःपरीक्षा घेण्याबाबत सर्व संबंधितांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या ऑनलाईन बैठकीस उपस्थितांचे विद्यापीठाचे मा. कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांनी परीक्षेसंदर्भात सविस्तर माहिती व वेळापत्रक लवकरच विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ www.muhs.ac.in  वर प्रसिध्द करण्यात येणार आहे.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन पहाटे हीे घेता येणार

नाशिक| प्रतिनिधी| नाताळ आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुट्ट्यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भाविकांना श्री. त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता पहाटे ४ वाजेपासून घेता येणार आहे. दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत ही दर्शन व्यवस्था राहणार असल्याची माहिती अध्यक्ष व विश्वस्त मंडळातर्फे देण्यात आली आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री. क्षेत्र त्र्यंबकेश्वराचे दर्शन आता दि. ३० डिसेंबर ते ४ जानेवारी पर्यंत पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत घेता येणार आहे, विश्वस्त मंडळाने घेतलेल्या निर्णयाची माहिती विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांनी माध्यमांना दिली. कडलग म्हणाले, नाताळ आणि येणारे नवीन वर्ष लक्षात घेता सुट्ट्या लक्षात घेऊन सुमारे ६० हजारावर भाविक दर्शनाला येण्याची शक्यता आहे. भाविकांची गैरसोय टाळावी विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतला आहे. दि. ३० डिसेंबर २०२५ पासून हा निर्णय लागू असून तो ४ जानेवारी २०२६ पर्यंत राहणार आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी पहाटे ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वाढीव गर्दी होण्याची शक्...