Skip to main content

आरोग्य विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्यायावत करण्याची प्रक्रिया सुरु

नाशिक| महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा बृहत आराखडा अद्यायावत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विद्यापीठाची सहावी यथार्थदर्शी योजना (Perspective Plan)  अद्यायावत करण्यासाठी आरोग्य शिक्षण क्षेत्रातील व्यक्ती, नागरिकांकडून अभिप्राय किंवा सूचना मागविण्यात येत आहे. विद्यापीठाचा बृहत आराखडा सर्वसमावेशक असावा याकरीता विद्यापीठाचे मा. प्रभारी कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, कुलसचिवडॉ. कालिदास चव्हाण, विद्यापीठाचे विविध प्राधिकरणाचे सदस्य प्रयत्नशिल आहेत.

The-process-of-updating-the-master-plan-of-the-Health-University-has-started

राज्यात आरोग्य विज्ञान शिक्षण सुविधांचे समन्याय वाटप व्हावे या दृष्टीकोनातून उच्चतर शिक्षणाच्या संस्थांची स्थाने निश्चित करण्यासाठी शैक्षणिक विकासाची यथार्थदर्शी विद्यापीठ योजना (Perspective Plan) तयार करण्यात येतो. शासनाने निर्देशित केल्यानुसार राज्यातील दुर्गम व आदिवासी भागात आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा मिळण्यासाठी महाविद्यालय सुरु करण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येते. विद्यापीठाचा सन 2022 ते 2027 या कालावधी करीता बृहत आराखडा करण्यात येणार आहे. या संदर्भात आरोग्य व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींनी विद्यापीठास सूचना, मार्गदर्शन करावे. सदर मार्गदर्शन, सूचना विद्यापीठास टपाल किंवा ई-मेल व्दारा विद्यापीठाकडे सादर पाठविण्याबाबत आवाहन       करण्यात येत आहे.


विद्यापीठ अधिनियमानुसार पाच वर्षांकरीता अद्यायावत बृहत आराखडा तयार करण्यात येतो. यामध्ये राज्यातील विविध विद्याशाखांचे महाविद्यालये, स्थानिक लोकसंख्या, जिल्हा किंवा तालुक्यातील महाविद्यालयांची संख्या, महाविद्यालयातील अंतर, महापालिकेस संलग्नित महाविद्यालय आदी बाबी महत्वपूर्ण असतात. याकरीता विद्यमान सन्माननीय मा. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद सदस्य, विविध संस्थांचे संस्थाचालक, विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयांचे अधिष्ठाता, प्राचार्य, विद्यापीठ प्राधिकरण सदस्य, समाजसेवक, जिल्हा शल्य चिकीत्सक यांची मते विचारात घेण्यात येतात. 
          

विद्यापीठाची स्थापना दि. 03 जून 1998 मध्ये झाली. आजपावेतो पाच बृहत आराखडा तयार करण्यात आले होते. या अनुषंगाने विद्यापीठाचा सन 2022 ते 2027 कालावधीसाठी बृहत आराखडा तयार करण्याचे कामकाज सुरु असल्याचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले.
विद्यापीठाचेwww.muhs.ac.in  संकेतस्थळावर विद्यापीठ बृहत आराखडा संदर्भात माहिती प्रसिध्द करण्यात आली असल्याचे विद्यापीठाच्या नियोजन विभागाचे प्र.संचालक डॉ. राजीव आहेर यांनी सांगितले. विद्यापीठाची सहावी यथार्थदर्शी योजना दर्जेदार व्हावी याकरीता नागरिकांनी व संबंधितांनी आपले अभिप्राय किंवा सुचना असल्यास अधिकृत ई-मेलवरुन विद्यापीठास planning@muhs.ac.in  ईमेलवर पत्त्यावर किंवा टपालाव्दारे दि. 10 जून 2021 पर्यंत पाठवावेत. विहित वेळेत प्राप्त अभिप्रायांचा विद्यापीठाकडून सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल. तरी संबंधितांनी व नागरिकांनी आपले अभिप्राय व सूचना विद्यापीठाकडे सादर कराव्यात.

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...