Skip to main content

औरंगाबाद शहर अनलॉक! शहरातील सर्व निर्बंध शिथिल

औरंगाबाद| महानगरपालिका क्षेत्रातील निबंध पूर्णतः उठवण्याचा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतला असून त्याबाबतचे आदेश आज जारी करण्यात आले आहेत. यामुळे औरंंगाबाद शहर तब्बल १०० दिवसांनी पुन्हा एकदा पुर्ववत सुरू होणार आहे. औरंगाबाद महापालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्हिटी दर २.२४ टक्के आणि भरलेल्या ऑक्सीजन बेड्सची संख्या २२.१९ टक्के असल्यामुळे औरंगाबाद महापालिका क्षेत्र शासनाने निर्धारित केलेल्या पहिल्या गटात समाविष्ट झाले आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील निबंध पूर्णतः शिथील करण्यात आले आहेत. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात ७ जूनच्या सकाळी ७ वाजेपासून नवीन सुधारित आदेश लागू होतील. 
Aurangabad-city-unlocked-All-restrictions-in-the-city-relaxed
फोटो: फाईल

अत्यावश्यक वस्तू व सेवा संबंधी व्यवसाय व दुकाने - अत्यावश्यक सेवा आणि व्यवसायाची दुकाने नियमितपणे सुरू राहतील. मास्क, शारीरिक अंतर आणि सुरक्षा उपकरणांचा वापर अनिवार्य राहील. 

इतर सर्व व्यवसाय व दुकाने - अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व प्रकारची दुकानेही नियमितपणे उघडता येतील. अत्यावश्यक सेवेच्या याही दुकानांना मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर आणि निर्देशांचे पालन करावे लागेल. 

मॉल्स / चित्रपटगृहे / नाटयगृहे - औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रातील मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे नियमितपणे उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळी, शिवभोजन थाळी - महापालिका क्षेत्रातील रेस्टॉरंट, हॉटेल्स, खानावळीही नियमितपणे उघडता येतील. मास्क, सॅनिटायझर, शारीरिक अंतर आदी बाबींचे पालन करावे लागेल. 

 सार्वजनिक ठिकाणे / क्रीडांगणे, मोकळयाजागा, उद्याने / बगीचे, मॉर्निंग वॉक व सायकलिंगलाही परवानगी देण्यात आली आहे. 

 खासगी कार्यालये - सरकारच्या ४ जूनच्या आदेशानुसार सर्व आस्थापना जसे, खाजगी बँका, विमा, औषध कंपनी, सुक्ष्म वित्तसंस्था व गैर - बँकिंग वित्त - संस्था इत्यादी कार्यालये नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील. 

 कार्यालयीन उपस्थिती - शासकीय / निमशासकीय / खाजगी आस्थापना नियमितपणे कार्यालयीन वेळेपर्यंत १०० टक्के क्षमतेने सुरु राहतील.

  क्रीडा, चित्रीकरण, विवाह समारंभ, अंत्यविधी, स्नेहसंमेलने, सामाजिक, सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम सभा / निवडणुका नियमितपणे घेण्यास परवानगी राहील. 

 बांधकाम, कृषी संबंधित बाबी, ई-कॉमर्स वस्तू व सेवा नियमितपणे सुरू राहतील. 

 औरंगाबाद महापालिका क्षेत्रात जमावबंदी किंवा संचारबंदी लागू राहणार नाही. 

 जीम / सलुन / ब्युटी पार्लर / स्पा / वेलनेस सेंटर नियमित सुरू करता येतील. 

 सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी राहिल. परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई राहील. 

 आंतर जिल्हा प्रवासी वाहतूक (खाजगी कार , टॅक्सी , बस) व रेल्वेने पूर्ण आसन क्षमतेने प्रवास करण्यास परवानगी राहील. परंतु प्रवाशांना उभ्याने प्रवास करण्यास मनाई राहील. तथापि जर प्रवासी लेवल ५ मधील भागातून अथवा जिल्हामार्गे प्रवास करीत असल्यास अशा प्रवाशांना ई - पास आवश्यक राहील. 

 *उपरोक्त सर्व बाबींसाठी कोरोना अनुकूल वर्तन अनिवार्य आहे.* 

 *निर्बंध शिथिलतेबरोबरच अटीही लागू* 

 सर्व उदयोग, व्यवसाय व खाजगी आस्थापना व त्यांचे कर्मचा-यांना निगेटीव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक राहील. (वैधता १५ दिवसांकरिता) निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवालाशिवाय दुकान / व्यवसाय सुरु करता येणार नाही.

 या नियमांचे उल्लंघन केल्यास कोराना महामारीची आपत्ती जोपर्यंत अस्तित्वात आहे तो पर्यंत संबंधित दुकान / आस्थापना बंद ठेवण्यात येईल, तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित आदेशाप्रमाणे दंड आकारण्यात येईल.

या निर्देशांचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात (नागरी भागात) आयुक्त तथा प्रशासक, महानगरपालिका औरंगाबाद यांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी इंसिडेंट कमांडर तथा जिल्हाधिकारी / तहसिलदार, औरंगाबाद यांची राहील. 

 सदरचे आदेश आवश्यकतेनुसार रद्द किंवा सुधारित करू शकतील, असे जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे

सोर्स:DIOऔरंगाबाद

Popular posts from this blog

त्र्यंबकेश्वर मंदिरात पाचवे एईडी उपकरण बसविले, हृदयविकाराच्या रुग्णांना मिळणार जीवदान!

नाशिक| हृदयाच्या समस्या टाळून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी महत्वाचे असलेलं ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) उपकरण कुंभमेळा आयुक्त शेखरसिंग यांच्या हस्ते बसविण्यात आले, एखाद्या भाविकाला  हृदय विकाराचा झटका आल्यास त्याला तत्काळ उपचार मिळण्यास मदत होणार. आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरातील हे पाचवे उपकरण असल्याचे विश्वस्त व्यवस्थेमार्फत सांगण्यात आले.  डिफिब्रिलेटर हे एक वैद्यकीय उपकरण आहे. जे हृदयाचे ठोके असामान्य झाले तर सामान्य करण्यास मदत करते. हृदयाच्या समस्या टाळण्यास मदत करते व रूग्णांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते वैद्यकीय क्षेत्रातील एक महत्त्वाचे उपकरण असून हे सार्वजनिक ठिकाणी वापरले जाते. विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन (VUHF) यांच्या वतीने पवित्र श्री त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) यशस्वीरित्या बसविण्यात आले. हा उपक्रम व्हीयुएचएफ फाउंडेशनच्या ‘मेकिंग नाशिक हार्ट-सेफ, हार्ट-स्ट्रॉंग’ या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.  सदर एईडी हे उपकरण विजन’स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनकडून दान करण्यात आले...

दहा तास आधी रेल्वे आरक्षण चार्ट

नाशिक रोड, प्रतिनिधी| सर्व रेल्वे गाड्यांसाठी दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्यास ३० डिसेंबर २०२५ पासून प्रारंभ होणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. सध्या आरक्षणाचा चार्ट रेल्वे गाडी रवाना होण्याच्या आठ तास आधी तयार केला जातो. यामुळे प्रवाशांच्या मनात प्रवासाच्या नियोजनाबाबत अनिश्चितता निर्माण होते. ही अनिश्चितता दूर करण्यासाठी   रेल्वे बोर्ड प्रवासाच्या दहा तास आधी आरक्षण चार्ट तयार ३० डिसेंबर प्रारंभ करणार आहे.   दहा तास आधी प्रथम आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रिया प्रवास सुरू करण्या आधी अनिवार्य करण्यात येत आहे. या संदर्भातील “रिमोट लोकेशनवरील” आरक्षण केंद्रांवरील मॅन्युअल प्रथम चार्ट तयार करण्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहे:    गाड्यांची प्रस्थान वेळ – ०५:०१ ते १४:०० वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट आदल्या दिवशी रात्री २०:०० वाजेपर्यंत तयार करण्यात येईल. गाड्यांची प्रस्थान वेळ – १४:०१ ते २३:५९ वाजेपर्यंत:    प्रथम आरक्षण चार्ट प्रस्थानाच्या १० तास आधी तयार करण्यात येईल.   गाड्यांची प्रस्थान वेळ – ००:०० त...

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक

'चॅम्पियन्स'ची हॅट्रीक आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या एकूण ७ स्पर्धा भारताने जिंकल्या आहे. भारताने १९८३ व  २०११ ला एकदिवसीय वर्ल्डकप तर २००७ व २०२४ मध्ये  टी-२० चषक तसेच २००२, २०१३ आणि २०२५ अशी तीन वेळा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा जिंकली आणि 'चॅम्पियन्स' चषकाची ही हॅट्रीक मारली. यंदा ही स्पर्धा जिंकण्याचा अत्याधिक आनंद असा की २००० साली भारताला नमवून न्यूझीलंडने अंतिम सामना खिशात टाकला होता. अखेर तब्बल २५ वर्षानंतर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून परतफेड करत चॅम्पियन्स चषक जिंकला. सुरुवातीच्या काळात नॉकआऊट ट्रॉफी नावाने खेळविल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या स्वरूपांमध्ये बदल झाले. १९९८ आणि २००० मध्ये पहिल्या दोन स्पर्धा नॉकआउट ट्रॉफी म्हणून खेळवल्या गेल्या.  त्यानंतर २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असे नामकरण झाल्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यात  अंतिम सामना झाला. पावसामुळे त्यात दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद देण्यात आले. भारताने ही स्पर्धा तीन वेळा जिंकली आहे, ज्यामध्ये सौरव गांगुली,  एम एस धोनी आणि रोहित शर्मा हे तिघे विजेत्या संघांचे कर्णधार होते. त्यामुळे भारता...